​सुहाग या चित्रपटात आजचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक बनला होता अक्षय कुमारचा बॉडी डबल... ओळखा पाहू कोण आहे तो दिग्दर्शक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 10:30 AM2017-10-14T10:30:23+5:302017-10-14T16:00:23+5:30

सुहाग या चित्रपटात अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अॅक्शन सीन पाहायला ...

Akhil Kumar's body double, which became a famous director in the movie Suhag. Who is going to know who is the director? | ​सुहाग या चित्रपटात आजचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक बनला होता अक्षय कुमारचा बॉडी डबल... ओळखा पाहू कोण आहे तो दिग्दर्शक?

​सुहाग या चित्रपटात आजचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक बनला होता अक्षय कुमारचा बॉडी डबल... ओळखा पाहू कोण आहे तो दिग्दर्शक?

googlenewsNext
हाग या चित्रपटात अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळाले होते. नव्वदीच्या दशकात अनेकवेळा नायक नव्हे तर त्यांचे बॉडी डबल अॅक्शन सीन चित्रीत करायचे. सुहाग या चित्रपटात देखील अक्षयने अॅक्शन दृश्य चित्रीत न करता बॉडी डबलचा वापर केला होता. अक्षयने बॉडी डबलचा वापर केला होता हे वाचल्यावर खरे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असणार. कारण अक्षय हा अॅक्शन हिरो मानला जात असल्याने त्याला बॉडी डबलची गरचज काय पडली होती असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण सुहाग या चित्रपटातील अॅक्शन दृश्य खूपच कठीण असल्याने अक्षय ऐवजी त्याच्या बॉडी डबलने ही दृश्य चित्रीत केली होती. चित्रपट पाहाताना या दृश्यात अक्षयच आहे असे लोकांना वाटावे यासाठी अक्षय कशाप्रकारे चालतो हे देखील हा बॉडी डबल शिकला होता. 
सुहाग या चित्रपटात अक्षय कुमारचा बॉडी डबल बनलेला व्यक्ती आज एक प्रसिद्ध दिग्दर्शक बनला आहे. या दिग्दर्शकाने आजवर  गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांची नाव वाचल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल की या दिग्दर्शकाचे नाव काय आहे. हा दिग्दर्शक दुसरा कोणीही नसून रोहित शेट्टी आहे. रोहित शेट्टीनेच सुहाग चित्रपटाच्या वेळेचा किस्सा नुकताच एका कार्यक्रमात सांगितला आहे. रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी त्याने नुकतीच ही गोष्ट सगळ्यांना सांगितली.

rohit shetty


सुहाग या चित्रपटाच्या वेळी रोहित नुकताच इंडस्ट्रीत आला असून त्यावेळी तो नायकांचा बॉडी डबल म्हणून काम करत असे. सुहाग या चित्रपटाच्यावेळी अक्षय आणि अजयला तो सेटवर सर अशी हाक मारायचा. रोहितचे वडील एम.बी.शेट्टी हे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन होते. त्याच्यामुळेच रोहितला लहान वयापासूनच स्टंटचे आकर्षण वाटू लागले. त्याच्या सगळ्याच चित्रपटात आपल्याला अनेक स्टंट पाहायला मिळतात. 

Also Read : या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट

Web Title: Akhil Kumar's body double, which became a famous director in the movie Suhag. Who is going to know who is the director?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.