Tanhaji Movie : पाचव्या आठवड्यातही ‘तान्हाजी’ची चलती, इतक्या कोटींवर पोहोचला कमाईचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:10 PM2020-02-13T14:10:32+5:302020-02-13T14:11:37+5:30

Tanhaji Movie Box Office Collection : अजय देवगणचा ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे.

ajay devgn starrer film tanhaji the unsung warrior day 34 box office collection | Tanhaji Movie : पाचव्या आठवड्यातही ‘तान्हाजी’ची चलती, इतक्या कोटींवर पोहोचला कमाईचा आकडा

Tanhaji Movie : पाचव्या आठवड्यातही ‘तान्हाजी’ची चलती, इतक्या कोटींवर पोहोचला कमाईचा आकडा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘तान्हाजी’चा एकूण बजेट 125 कोटी आहे. हा बजेट कधीच वसूल झालाय.

अजय देवगणचा ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे. काही राज्यांत टॅक्स फ्री असल्याने ‘तान्हाजी’ची कमाई सुरु आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 269.25 कोटींचा बिझनेस केला आहे.
काल बुधवारी ला चित्रपटाने सुमारे 70 लाखांची कमाई केली. पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी चित्रपटाने 1.15 कोटी, शनिवारी 2.76 कोटी, रविवारी 3.45 कोटी, सोमवारी 88 लाखांचा गल्ला जमवला. पाचव्या आठवड्यानंतर चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 270 कोटींवर पोहोचला आहे. प्रेक्षकांची क्रेज बघता, येत्या दिवसांत हा सिनेमा 300 कोटींचा पल्ला गाठेल, असे दिसतेय. 

महाराष्ट्रात या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. पाचव्या आठवड्यात ‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या सिनेमासोबत ‘तान्हाजी’ची टक्कर झाली. ‘मलंग’ आणि ‘शिकारा’ने पहिल्याच आठवड्यात निराशा केली.

हे दोन्ही सिनेमे ‘तान्हाजी’ची घोडदौड थांबवू शकले नाहीत. उद्या शुक्रवारी सारा अली खान व कार्तिक आर्यनचा ‘लव्ह आज कल’ रिलीज होतोय. अशास्थितीत ‘तान्हाजी’ला आणखी एक आव्हान मिळणार आहे. ‘लव्ह आज कल’ विरूद्ध ‘तान्हाजी’चा सामना कसा रंगतो हे लवकरच कळेल. तूर्तास तरी ‘तान्हाजी’ हाच बॉक्स ऑफिसवर ‘राज्य’ करतोय.
‘तान्हाजी’चा एकूण बजेट 125 कोटी आहे. हा बजेट कधीच वसूल झालाय. पहिल्याच आठवड्यात  118.91 कोटी आणि दुसºया आठवड्यात 78.54 कोटींचा बिझनेस करत, हा बजेट वसूल झालाय.
‘तान्हाजी’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची वीरगाथा सांगणाºया या सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान व काजोल मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: ajay devgn starrer film tanhaji the unsung warrior day 34 box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.