ठळक मुद्देनकारात्मक प्रतिक्रियांचा माझ्या मुलीला काहीही फरक पडत नाही. डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत अजयने सांगितले आहे की, याप्रकारचे ट्रोल जे करतात, त्यांची मनोवृत्ती अतिशय वाईट असते. त्यामुळे अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो.

सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. सुहाना खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर यांसारख्या स्टार किडला तर अनेकवेळा सोशल मीडियावर लोकांच्या वाईट कमेंट्सचा सामना करावा लागलो. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक आहे. आई-वडिलांइतकीच न्यासा सुद्धा सतत चर्चेत असते. न्यासा देवगणला सोशल मीडियावर ट्रोल करणे यात काही नवीन नाहीये. कधी कपड्यांमुळे तर कधी लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते.

न्यासाला काही दिवसांपूर्वी मुंबईत एका सलोनच्या बाहेर पाहाण्यात आले होते. त्यावेळी स्टायलिश लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा फोटो मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण हा फोटो पाहाताच एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. कारण हा फोटो न्यासाच्या आजोबांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी पोस्ट करण्यात आला होता. आजोबांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी न्यासा सलोनच्या बाहेर दिसल्याने सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तिच्या आजोबांचे निधन नुकतेच झाले असताना ती सलोनला कशी का जाऊ शकते असे काहींनी कमेंट केले होते तर हा फोटो पाहिल्यानंतर या स्टार किडना खरंच भावना नसतात असे काहींनी म्हटले होते. खरंच हा फोटो त्यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी काढला आहे का हा प्रश्न देखील मानवला सोशल मीडियाद्वारे विचारण्यात आले होते. 

न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर अजयने शांत राहाणेच पसंत केले होते. पण आता अजय देवगणने म्हटले आहे की, अशाप्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा माझ्या मुलीला काहीही फरक पडत नाही. डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत अजयने सांगितले आहे की, याप्रकारचे ट्रोल जे करतात, त्यांची मनोवृत्ती अतिशय वाईट असते. त्यामुळे अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आपली खोटी ओळख बनवून लोकांच्या फोटोंवर नको ते कमेंट करणाऱ्या लोकांकडे लक्ष न दिलेलेच बरे असे मला वाटते.


Web Title: Ajay Devgn Reacts To Trolls Who Shamed Nysa Devgan For Visiting A Salon Post Her Grandfather's Death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.