धारावी कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचून ‘सिंघम’ खुश्श; असा व्यक्त केला आनंद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:15 PM2020-12-27T13:15:01+5:302020-12-27T13:15:49+5:30

धारावीतून कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याचे पाहून अनेक जणांनी समाधान व्यक्त केले. यातलाच एक म्हणजे अभिनेता अजय देवगण.

ajay devgn reacted on mumbai dharavi reported zero covid 19 case tweet viral | धारावी कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचून ‘सिंघम’ खुश्श; असा व्यक्त केला आनंद!!

धारावी कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचून ‘सिंघम’ खुश्श; असा व्यक्त केला आनंद!!

googlenewsNext
ठळक मुद्दे धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती.

भारतासह जगभरातील 180 पेक्षा अधिक देशांत कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळतोय. भारतातही कोट्यावधी लोक कोरोना व्हायरसचे शिकार ठरलेत. या महामारीत अनेकांनी प्राण गमावले. अशात नाताळच्या दिवशी मुंबईच्या धारावी परिसरातून एक गुडन्यूज आली. पहिल्यांदा धारावीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नाही. आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया मानल्या जाणा-या धारावीतून कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याचे पाहून अनेक जणांनी समाधान व्यक्त केले. यातलाच एक म्हणजे अभिनेता अजय देवगण.
होय, गेल्या 24 तासांत धारावीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नाही, ही बातमी वाचून अजय इतका खूश झाला की, लगेच त्याने एक ट्विट  केले.

‘नाताळ आपल्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आलाय. पाहा आता धारावीमध्ये एकही करोनाचा रुग्ण नाही,’ असे ट्विट करून त्याने आपला आनंद व्यक्त केला.

त्याच्या या ट्विटवर कमेंट्सचा पाऊस पडला नसेल तर नवल. अगदी काही तासांत शेकडो लोकांनी त्याच्या या ट्विटवर कमेंट्स केल्यात. काहींनी या ट्विटसाठी त्याचे कौतुक केले. अर्थात काहींनी ट्रोलही केले. अच्छा जी, सँटा आया और कोरोना ले गया, असे लिहित एका युजरने अजयच्या या कमेंटची खिल्ली उडवली.

सर, ख्रिसमस आला म्हणून हे झाले नाही. धारावीच्या लोकांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे साध्य झाले. बॉलिवूडच्या लोकांनो आता तरी सुधरा, असे एका युजरने लिहिले.
 धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3788 वर पोहोचली होती.  कोरोनाचा रोनाचा कहर सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच धारावीत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. 

Web Title: ajay devgn reacted on mumbai dharavi reported zero covid 19 case tweet viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.