ajay devgn next film ajay devgan will play the role of indian air force officer in bhuj the pride of india | अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका!
अजय देवगणचा आणखी एक ‘धमाका’! साकारणार विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका!

ठळक मुद्दे१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते.

गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात अजय भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारताना दिसेल.
मुव्ही क्रिटीक्स तरण आदर्श यांनी काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली. ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धदरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. अभिषेक दुधई द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट गिन्नी खानूजा,वजीर सिंह, भूषण कुमार यांची निर्मिती आहे.
१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते. पाकी हवाई हल्ल्यात भूज तळावरची धावपट्टी ध्वस्त झाली होती. ही धावपट्टी पुन्हा उभारणे गरजेचे होते. अशावेळी विजय कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत, बाजूच्या गावातील महिलांच्या मदतीने ही धावपट्टी उभारली होती. भारत-पाक युद्धात या धावपट्टीचे योगदान महत्त्वाचे राहिले आणि पर्यायाने ही धावपट्टी नव्याने उभारणारे विजय कर्णिक यांचे योगदानही अनन्यसाधारण ठरले. 
विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार असलेला अजय लवकरच फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. याशिवाय ‘तानाजी’हा त्याचा ऐतिहासिक चित्रपटातही या वर्षात प्रदर्शित होत आहे.

English summary :
Ajay Devgn has signed a new movie. In this film, Ajay will be seen playing the role of Indian Air Force's wing commander Vijay Karnik from. Movie Critics Taran Adarsh ​​announced this movie a few moments ago. The film is titled 'Bhuj-The Pride of India'.


Web Title: ajay devgn next film ajay devgan will play the role of indian air force officer in bhuj the pride of india
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.