ठळक मुद्देवीरू देवगण यांच्या शोकसभेत अजय आणि काजोलची मुलगी न्यासाला रडू कोसळले. तिची ही अवस्था पाहून लगेचच अजय मुलीला बाहेर घेऊन गेला. 

वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

वीरू देवगण यांची शोकसभा नुकतीच पार पडली. या शोकसभेला अजयच्या कुटुंबियांसोबतच सुनील शेट्टी, रवीना टंडन, कुणाल खेमू यांसारखे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या शोकसभेत अजय आणि काजोलची मुलगी न्यासाला रडू कोसळले. तिची ही अवस्था पाहून लगेचच अजय मुलीला बाहेर घेऊन गेला. 

वीरू देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देवगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा ते सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. काजोल सोबत त्यांचे नाते खूपच खास होते. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. काजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून एखाद्या लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडत होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते. 

वीरू देवगण यांनी ८० हून जास्त चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करता आले. वीरू यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. ते या चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिकांमध्ये दिसले होते. त्यांनी फाईट मास्टर म्हणून काम करण्यासोबतच हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. अजय देवगण, काजोल आणि महिमा चौधरी यांची मुख्य भूमिका असलेल्या दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते.  


Web Title: Ajay Devgn consoles a crying Nysa at his father Veeru Devgan's prayer meet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.