गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला अजय देवगण आणि संजय मिश्रा करणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2017 08:52 AM2017-03-11T08:52:39+5:302017-03-11T14:22:39+5:30

अजय देवगण आणि संजय मिश्रा लवकरच गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी बादशाहो या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच आटपले असून ते दोघे एकत्र गोलमाल अगेनच्या चित्रीकरणासाठी रवाना झाले आहेत. यावेळी संजय मिश्राने अजय देवगणची टर उडवण्याचा एक व्हिडिओ युट्युबला पोस्ट केला असून या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे.

Ajay Devgn and Sanjay Mishra begin shooting for Golmaal again | गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला अजय देवगण आणि संजय मिश्रा करणार सुरुवात

गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला अजय देवगण आणि संजय मिश्रा करणार सुरुवात

googlenewsNext
लमाल अगेन या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. त्यावेळी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अनेक कलाकार उपस्थित होते. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. पण तो गोलमालच्या मुहूर्ताच्यावेळी बादशाहो या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने तो मुहूर्ताला उपस्थित राहू शकला नव्हता. चित्रपटाच्या मुहूर्ताबाबत परिणिती चोप्राने एक ट्वीट करून गोलमाल फॅन्सने चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्याबद्दल सांगितले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, बंगलुरू, हैद्राबाद, उटी अशा भारतातील विविध ठिकाणी होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, नील नितीन मुकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बादशाहो या चित्रपटाचे चित्रीकरण उरकून अजय देवगण नुकताच गोलमाल अगेन या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रवाना झाला आहे. त्यावेळी संजय मिश्रादेखील त्याच्यासोबत त्याच्या विमानात होता. संजय आणि अजय हे दोघे बादशहो तसेच गोलमाल अगेन या दोन्ही चित्रपटात एकत्र काम करत आहेत. संजयदेखील अजयसोबत गोलमालच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. विमानातून जाताना संजयने एक व्हिडिओ बनवला असून तो युट्युबला शेअर केला आहे. या व्हिडिओत तो अजयसोबत मजा मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच अजयची व्हॅनिटी व्हॅन ही किती मोठी आहे हे सांगत त्याची टर उडवतानाही दिसतोय. एवढेच नव्हे तर अजय त्याला आवडत नसल्याचे या व्हिडिओत त्याने कबूल केले आहे. तसेच त्या दोघांना सतत काम करणारे मजदूर अशी उपमा त्याने यात दिली आहे. 
गोलमाल अगेन या चित्रपटाआधी गोलमाल फन अनलिमिटेड, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3 असे गोलमाल सिरिजचे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. 


Web Title: Ajay Devgn and Sanjay Mishra begin shooting for Golmaal again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.