Ajay devgn and kajol to reunite for romantic comedy movie | तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच!
तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच!

अजय देवगण आणि काजोल बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ते दोघे त्यांच्या कामात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते दोघे त्यांच्या कुटुंबियांसाठी नेहमीच वेळ काढतात. काही दिवसांपूर्वी ते दोघे आपल्या मुलांना घेऊन फिरायला गेले आहेत.

 तानाजीमध्ये दोघे एकत्र दिसणार असल्याची आधी चर्चा होती. मात्र आजतकच्या रिपोर्टनुसार दोघे कॉमेडी सिनेमात एकत्र झळकणार आहेत. अजय आणि काजोल स्क्रिप्ट फायनल होण्याची वाट बघत आहेत. याबाबत दोघांकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. सिनेमाची शूटिंग 2020 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती आहे.  


अजय देवगणचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी दोघे भुजला गेले होते. तिथले काही फोटो काजोलने सोशल मीडियावर शेअर केले होते. 
अजय देवगणचा दे दे प्यार दे हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या अजय आणि काजोल त्यांच्या तानाजीः द अन्संग हिरो या चित्रपटावर काम करत असून त्यांच्यासोबतच सैफ अली खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर काजोल आणि अजय या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. 


Web Title: Ajay devgn and kajol to reunite for romantic comedy movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.