अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 06:27 PM2021-04-20T18:27:00+5:302021-04-20T18:27:26+5:30

अजय देवगणची आगामी वेबसीरिज 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

Ajay Devgan's entry on OTT platform, first look release of 'Rudra the Age of Darkness' | अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज

अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण डिजिटल पदार्पणासाठी सज्ज असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र आता अजय हॉटस्टार स्पेशलच्या क्राईम ड्रामा वेब सीरिजमधून आपले डिजिटल पदार्पण करणार असल्याचे समजते आहे. या वेब सीरिजचे नाव 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस' असे आहे. या वेब सीरिजमध्ये अजय एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित केली जाणार आहे.

या वेब सीरीजची शूटिंग लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओ मिळून या वेब सीरिजची निर्मिती करणार आहे. आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल अजय म्हणाला की, 'नेहमीच चांगल्या लोकांसोबत काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस' ही प्रेक्षकांना बांधून ठेवणारी गोष्ट असून या प्रवासाच्या सुरूवातीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. पडद्यावर एका पोलिसाची भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन नाही, मात्र या वेळी हे पात्र अधिक कठीण आहे. या पात्राच्या व्यक्तिरेखेने मी सर्वाधिक प्रभावित झालो आहे.'


अजय देवगणने यापूर्वीच निर्माता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवर त्यांचा 'त्रिभंगा' हा होम प्रोडक्शन चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेणुका शहाणेने केले आहे. यात काजोलने मुख्य भूमिका साकारली होती.


अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो आरआरआर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आरआरआर चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट २०२१च्या दसऱ्याच्या दिवशी जगभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषेत रिलीज होणार आहे.

Web Title: Ajay Devgan's entry on OTT platform, first look release of 'Rudra the Age of Darkness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.