Join us  

इतक्या कोटींचा मालिक आहे बॉलिवूडचा सिंघम, जाणून घ्या त्याच्या संपत्तीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 12:35 PM

Ajay Devgan Net Worth : अजयचे वडील वीरू देवगण स्टंटमॅन होते. अजय वडिलांसोबत सेटवर जायला. सेटवरचे स्टंट पाहून अजय कॉलेजातही अनेक धोकादायक स्टंट करायचा.

आपल्या अभिनयाने अजय देवगणने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. विविध  सिनेमात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. 1991 साली त्याने अभिनयाला सुरुवात केली. 'फूल और काटे' सिनेमातून त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर 'जिगर', 'संग्राम', 'दिलवाले', 'दिलजले', 'ज़ख्म', 'हम दिल दे चुके सनम', 'कंपनी', 'दीवानगी', 'द लीजेंड ऑफ भगत सिंह', आणि सुपरहिट 'सिंघम' , 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या सिनेमातील या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बॉलिवूडचा सिंघम अशी उपाधी दिली.

बॉलिवूडचा सिंघम संपत्तीबाबतही खराखुरा किंग असल्याचं समोर आलं आहे. एका इंग्रजी वेबवसाईटनुसार अजय देवगण आज २५५ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. जाहिरात आणि सिनेमातून तो सर्वाधिक कमाई करतो. अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.

विशेष म्हणजे बॉलीवुडमध्ये सगळ्यात आधी अजयने खासगी जेट खरेदी केले. त्याच्याकडे सहा आसनी जेट असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तो याचा वापर करतो. शिवाय सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरतानाही तो हे जेट वापरतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, बॉलीवूडमध्ये खासगी जेट विकत घेणारा अजय पहिला अभिनेता होता. या जेटची किंमत सुमारे 84 कोटी असल्याचे सांगितले जाते. अजय देवगणकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. 

अजयकडे बी टाऊनमधील सर्वात आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे.यामध्ये ऑफिसची व्यवस्था, किचन आणि एक जिमची सुविधा आहे, शूटिंगच्या वेळी व्हॅनिटीमध्ये त्याचे सगळ्या गोष्टी तो अगदी घराप्रमाणेच व्हॅनिटी व्हॅनमध्ये करोत.

 

इतकेच काय तर लंडनच्या पार्क लेनमध्येही आलिशान असे घर त्याने खरेदी केले आहे.  ज्याची किंमत  54 कोटी रुपये आहे. अजयचे लंडनमधील घर पार्क लेनमध्ये शाहरुख खानच्या घराच्या  शेजारीच आहे. 

अजय रिअल लाईफमध्ये अतिशय मितभाषी आहे. पण सुरुवातीपासून स्टंट करण्याचा छंद त्याला होता. अजयचे वडील वीरू देवगण स्टंटमॅन होते. अजय वडिलांसोबत सेटवर जायला. सेटवरचे स्टंट पाहून अजय कॉलेजातही अनेक धोकादायक स्टंट करायचा. विश्वास बसणार नाही. पण कॉलेजच्या दिवसांत काही लोक त्याला ‘गुंड’ म्हणून ओळखायचे. अर्थात अजयचे मानाल तर ख-या आयुष्यात त्याने कधीही गुंडगिरी केली नाही.

टॅग्स :अजय देवगणकाजोल