अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:02+5:30

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अजय देवगण आणि काजोल त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगणार आहेत.  

Ajay Confessed on The Kapil Sharma Show that I don't get vanity can in my own production | अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

googlenewsNext
ठळक मुद्देदुसर्‍या कोणाच्या चित्रपटामध्ये काम करताना अजय आणि काजोल वेगवेगळी व्हॅनिटी व्हॅन वापरतात. पण स्वतःच्या घरातील निर्मिती असताना मात्र एकच व्हॅनिटी वापरतात. त्यावर अजय टिप्पणी करतो, “नाही, माझी निर्मिती असेल तर माझ्याकडे व्हॅनिटीच नसते.”

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. 

या आठवड्यात, द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अजय देवगण आणि काजोल ‘तान्हाजी’ या चित्रपटाचे प्रमोशन करायला हजेरी लावणार आहेत. त्याचसोबत या कार्यक्रमाच्या सेटवर मजा मस्ती करताना दिसणार आहेत. अजय आणि काजोलने आजवर अनेक चित्रपटात एकत्र काम केले असून त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. तान्हाजी या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने त्यांचे फॅन्स प्रचंड खूश आहेत. तसेच ते ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगणार आहेत.
 
गप्पा मारताना कपिलने काजोल खूप बडबडी असल्यामुळे अजय अबोल झाला आहे का असे अजयला विचारले असता त्याने सांगितले, “हो, हे खरे आहे. तिला माझ्या वतीने तिला बोलण्याची सवय आहे.” तसेच कपिलने विचारले की, जेव्हा चित्रपटाच्या कथानकामध्ये काजोलच्या धडपडण्याचा प्रसंग असतो तेव्हा तो चित्रपट आपोआप हिट होतो म्हणून अजय असे प्रसंग चित्रपटात सामील करण्याचा प्रयत्न करतो का? त्यावर अजय म्हणाला, “ती खरोखर पडली तर केवळ माझे घरातील काम दुप्पट होते.” या विधानाला सहमती देत काजोल पुष्टी जोडते, “हे काही अंशी खरे आहे कारण माझ्या बर्‍याच चित्रपटांमध्ये माझे धडपडण्याचे प्रसंग आहेत.”
 
कपिलने त्या दोघांवर विनोदाची सरबत्ती चालू ठेवत विचारले की, दुसर्‍या कोणाच्या चित्रपटामध्ये काम करताना अजय आणि काजोल वेगवेगळी व्हॅनिटी व्हॅन वापरतात. पण स्वतःच्या घरातील निर्मिती असताना मात्र एकच व्हॅनिटी वापरतात. त्यावर अजय टिप्पणी करतो, “नाही, माझी निर्मिती असेल तर माझ्याकडे व्हॅनिटीच नसते.”
 
 

Web Title: Ajay Confessed on The Kapil Sharma Show that I don't get vanity can in my own production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.