ठळक मुद्देश्रीमा ही दिसायला खूपच सुंदर असून तिने २००९ मध्ये मिसेस इंडिया हा किताब मिळवला आहे.

ऐश्वर्या रायने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने सन्मामित करण्यात आलं आहे. ऐश्वर्या ही मिस वर्ल्ड असून तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर दिसते असे तिच्या फॅन्सचे म्हणणे असते. ऐश्वर्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. 

ऐश्वर्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला तिच्या फॅन्सना आवडते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. त्यामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस अंदाजातील अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ऐश्वर्या इन्स्टाग्रामला अनेकवेळा तिच्या आईसोबतचे फोटो पोस्ट करते. तुम्हाला माहीत आहे का, ऐश्वर्याला एक भाऊ असून त्याचे नाव आदित्य राय आहे. आदित्य मर्चंट नेव्हीमध्ये काम करत असून त्याचे लग्न शिमासोबत झालेले आहे. त्याची पत्नी श्रीमा ही दिसायला खूपच सुंदर असून तिने २००९ मध्ये मिसेस इंडिया हा किताब मिळवला आहे.

श्रीमाचे फोटो पाहिल्यानंतर श्रीमा ऐश्वर्या इतकीच सुंदर असल्याचे आपल्या लक्षात येते. श्रीमाचे अनेक ग्लॅमरस फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. श्रीमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदित्य आणि त्यांच्या मुलांचे देखील अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमा ही मॉडेल असली तरी लग्नानंतर मुलांकडे लक्ष देण्यासाठी तिने तिचे करियर सोडले. त्यामुळे ती लाईमलाईटपासून दूरच असते. 

२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांना मिळाले. 


Web Title: Aishwarya Rai Bachchan's sister-in-law Shrima Rai is as beautiful as aishwarya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.