'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 06:30 PM2020-11-09T18:30:00+5:302020-11-09T18:30:00+5:30

'हम दिल दे चुके सनम'च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली.

Aishwarya Rai Bachchan Was Not First Choice For Salman Khan Starrer Hum Dil De Chuke Sanam | 'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली पसंती

'हम दिल दे चुके सनम' सिनेमासाठी ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली पसंती

googlenewsNext

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा 'हम दिल दे चुके सनम' 1999 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमानं ऐश्वर्या रायला नवी ओळख मिळवून दिली...'हम दिल दे चुके सनम'च्या या नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली. सिनेमात ऐश्वर्याच्या अभिनय कौशल्यासोबतच डान्सचंही तितकंच कौतुक झालं. या सिनेमानं रसिकांवर जादू केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं.


प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेली या नंदिनीनं रसिकांवर जादू केली. ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण तुम्हाला माहिती आहे  का?  ऐश्वर्याने साकारलेल्या नंदिनी या भूमिका  आधी दुसर्‍या अभिनेत्रीला ऑफर केली गेली होती. म्हणजेच या भूमिकेसाठी ती पहिली पसंती नव्हती.

 

संजय लीला भन्साळीने ऐश्वर्याआधी करीना कपूरला ही भूमिका ऑफर केली होती. पण त्याचवेळी करिना उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली होती जर करिनाने होकार दिला असता तर आज तिचा हा  डेब्यू चित्रपट ठरला असता.

करीना कपूरने अभिषेक बच्चनसह 2000 साली दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या ‘शरणार्थी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. करीनाने आजपर्यंत  भंसालीसह एकही चित्रपटात काम केले नाहीय, भन्साळींनी 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाची ऑफरही  करिनाला दिली होती पण ती यातही काम करू शकली नाही. तेव्हाही बेबो दुस-याच कामात व्यस्त होती.


वर्कफ्रंटबद्दल बोलताना करीना कपूर आता 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात आमिर खान सोबत दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. याशिवाय त्यांच्याकडे करण जोहरचा 'तख्त' हा चित्रपटदेखील आहे.

करीना कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर पुढच्या वर्षी 2021 मध्ये तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे.करीना सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Web Title: Aishwarya Rai Bachchan Was Not First Choice For Salman Khan Starrer Hum Dil De Chuke Sanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.