Aishwarya rai bachchan old pictures goes viral on social media fans reacted | ऐश्वर्या रायचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल, यूजर्स म्हणाले - 'आराध्याची कार्बन कॉपी'

ऐश्वर्या रायचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल, यूजर्स म्हणाले - 'आराध्याची कार्बन कॉपी'

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.. आता ती चित्रपटात पूर्वीसारखी सक्रीय दिसत नाही. मात्र तिचे जुने फोटो आताही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऐश्वर्याच्या या फोटोवर फॅन्स जोरदार कमेंट करतायेत. ऐश्वर्याचा हा फोटो खूप जुना आहे. यात ती खूपच तरुण आणि सुंदर दिसतेय. 

 अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता, तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दिसू शकला नाही पण ऐश्वर्या राय दिसली. सोनमने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवरुन काढून टाकला आहे पण आता हा फोटो अ‍ॅशच्या फॅन पेजने शेअर केला आहे.

ऐश्वर्याच्या चाहत्यांना खूपच आवडला  आहे. यूजर्स या फोटोवर सतत कमेंट करतायेत. एका यूजरने कमेंट केली, 'सर्वात सुंदर अभिनेत्री'. दुसर्‍या यूजरने लिहिले, 'आराध्याची कार्बन कॉपी.' 

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती फन्ने खां चित्रपटात झळकली होती. ऐश्वर्या राय बच्चन मेलफिसेंटः मिस्ट्रेस ऑफ एविलच्या हिंदी व्हर्जनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या जागी पहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी तिने अँजेलिना जोलीसारखा लूक केला होता, जो लोकांना खूप भावला होता. याशिवाय ती दिग्दर्शक मणिरत्नमच्या चित्रपटात दिसू शकते आणि अनुराग कश्यपच्या गुलाब जामुन चित्रपटातही दिसणार आहे.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya rai bachchan old pictures goes viral on social media fans reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.