मेट गालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते यंदाच्या कान्स फेस्टिव्हलवर. मेट गालामध्ये बॉलिवूडमधील तारकांचा गेटअप पाहिल्यानंतर सगळ्यांना कान्स फेस्टिव्हलमध्ये या तारका कोणत्या लूकमध्ये पहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. चाहत्यांप्रमाणे या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटीदेखील तयारीला लागल्या आहेत. आता बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतचेच पहा ना... तिने तर कान्ससाठी फक्त दहा दिवसांत पाच किलो वजन घटविले आहे.

'मणिकर्णिका' चित्रपटानंतर कंगना रानौतने 'पंगा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. या चित्रपटासाठी तिने वजन वाढविले. या चित्रपटाचे दररोज अकरा तास शूटिंग चालते.

आता कंगनाने कान्स फेस्टिव्हलवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कारण मागील वर्षी कंगनाने कान्स फेस्टिव्हलमध्ये काळ्या रंगांची डिझाइनर साडी परिधान केली होती आणि दुसऱ्या लूकमध्ये तिने कॅट वुमेनचे गेटअप केले होते. त्यावेळी तिच्या लूकची खूप चर्चा झाली होती. 

यावर्षीदेखील कंगना साडी नेसणार आहे आणि तिही डिझायनर. नुकतीच या फेस्टिव्हलला सुरूवात झाली असून कंगना, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण व सोनम कपूर कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत.

पंगा व्यतिरिक्त कंगनाचा 'मेंटल है क्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करते आहे. तर प्रकाश कोवेलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात कंगना व राजकुमार रावशिवाय अमायरा दस्तूर, अमृता पूरी, जिमी शेरगिल असे सगळे कलाकार आहेत. शाहरूख खानही यात कॅमिओ रोलमध्ये असल्याची चर्चा आहे.

आधी या चित्रपटासाठी करिना कपूरचे नाव फायनल झाले होते. पण चित्रपटाच्या बोल्ड कंटेन्टमुळे करिनाने हा चित्रपट नाकारला आणि चित्रपटात कंगनाची वर्णी लागली.

Web Title: Ahead of Cannes appearance, Kangana Ranaut loses 5kg in 10 days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.