अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा 'तडप' येणार या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:36 PM2021-08-24T19:36:18+5:302021-08-24T19:36:41+5:30

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया ही फ्रेश जोडी 'तडप' चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Ahan Shetty and Tara Sutaria's 'Tadap' will meet on this day | अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा 'तडप' येणार या दिवशी भेटीला

अहान शेट्टी आणि तारा सुतारियाचा 'तडप' येणार या दिवशी भेटीला

googlenewsNext

नाडियादवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंटचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'तड़प - अँन इनक्रेडिबल लव स्टोरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तारा सुतारियासोबतअहान शेट्टी दिसणार आहे. अहान शेट्टी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा ३ डिसेंबर २०२१ला प्रदर्शित होणार आहे. 

तडफ चित्रपटात अहान सोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तारा सुतारियाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.


अहान शेट्टी आणि तारा सुतारिया एका नव्या फ्रेश  जोडीसोबत सर्वात रोमांचक पद्धतीने समोर येणारी प्रेम कहाणी, प्रेक्षकांसाठी निश्चितपणे एक छानशी ट्रीट असेल. 'तड़प'मधील अहानच्या फर्स्ट लुकने प्रेक्षकांमध्ये उत्साहाची एक मोठी लाट निर्माण केली आहे आणि एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.


'तड़प' मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माण साजिद नाडियाडवाला यांच्याद्वारे करण्यात आले असून फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा सह-निर्मित आहे. चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.

Web Title: Ahan Shetty and Tara Sutaria's 'Tadap' will meet on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.