ठळक मुद्देया व्हिडिओवर सलमान खानला खूप मजेशीर प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. एका युझरने तर चक्क सलमानची तुलना वेलकम चित्रपटामधील मजनू भाईशी केली आहे.

सलमान खानला बॉलिवुूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. सलमानचा भारत हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सलमान एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच तो खूप चांगला पेंटर आहे. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ काढून पेंटिंग या त्याच्या छंदाला नेहमीच वेळ देतो. अनेकेवेळा सलमान त्याने काढलेले पेंटिंग्स त्याच्या आवडत्या लोकांना गिफ्ट देखील करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानच्या एका नव्या पेंटिंगमुळे त्याची तुलना चक्क वेलकम या चित्रपटातील मजनू भाईसोबत होत आहे.

अक्षय कुमार, नाना पाटेकर, कतरिना कैफ, परेश रावल आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला वेलकम हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात अनिल कपूरने मजनू भाईची व्यक्तिरेखा साकारली होती, हा मजनू भाई गुंड असला तरी त्याला चित्र काढण्याची आवड असते. तो अतिशय सुंदर चित्र काढतो असे त्याला वाटत असते. पण त्याची चित्रं पाहून समोरच्याला हसू कोसळत असते. तो अतिशय वाईट पेंटर असतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या सुपरहिट गाण्यावर पेंटिंग बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून केवळ १३ तासांत हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण या व्हिडिओवर सलमान खानला खूप मजेशीर प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. एका युझरने तर चक्क सलमानची तुलना वेलकम चित्रपटामधील मजनू भाईशी केली आहे.

सलमान हे पेंटिंग काढत असताना बॅकग्राउंडमध्ये हर दिल जो प्यार करेगा हे गाणे सुरू आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, हा डॉयलाग माझा मित्र साजिद नाडियाडवालाच्या ग्रँडसनने लिहीला आहे...त्यावेळेस मला वाटले हा कम्पलीट आहे पण...' 


Web Title: After watching salman khan painting netizens compare him with welcome majnu bhai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.