‘कलंक’च्या सेटवर अपघातांची मालिका! आलिया, वरूणनंतर आदित्य रॉय कपूर जखमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 06:36 PM2018-07-06T18:36:20+5:302018-07-06T18:37:17+5:30

करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे. पण या सेटवरून कायम अपघाताच्या बातम्या येत आहेत. चित्रपटाच्या सेटवर एका पाठोपाठ एक असे कलाकार जखमी होत असल्याचे पाहून चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. 

after Varun Dhawan and alia bhatt adity roy kapur injured on the sets of kalank | ‘कलंक’च्या सेटवर अपघातांची मालिका! आलिया, वरूणनंतर आदित्य रॉय कपूर जखमी!!

‘कलंक’च्या सेटवर अपघातांची मालिका! आलिया, वरूणनंतर आदित्य रॉय कपूर जखमी!!

googlenewsNext

करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे. पण या सेटवरून कायम अपघाताच्या बातम्या येत आहेत. चित्रपटाच्या सेटवर एका पाठोपाठ एक असे कलाकार जखमी होत असल्याचे पाहून चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलंक’च्या सेटवर अभिनेता वरूण धवन जखमी झाला होता. यानंतर आलिया भट्ट ही सुद्धा शूटींगदरम्यान जखमी झाला होती. आता आलिया व वरूणपाठोपाठ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारा अभिनेता आदित्य रॉय कपूर हा सुद्धा सेटवर जखमी झाल्याची बातमी आहे. प्राप्त माहितीनुसार, एक कठीण अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना आदित्यची पकड सुटली आणि तो घसरून पडला. या अपघातात त्याच्या जबड्याला दुखापत होवून एक दात तुटल्याचे कळतेय. या अपघातानंतर आदित्यला त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी आदित्यला आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याचे कळतेय.
निमार्ता- दिग्दर्शक करण जोहर व त्याचे वडील यश जोहर यांनी 15 वषार्पूर्वी या चित्रपटाचे नियोजन केले होते. या सिनेमात आधी अभिनेत्री श्रीदेवी या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार होत्या. पण आता श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित या सिनेमात झळकणार आहे. माधुरीबरोबरच संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर हे कलाकारही या सिनेमात असतील. ‘कलंक’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त तब्बल 21 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.
अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.‘कलंक’या सिनेमाची कल्पना 15 वर्षाआधी सुचली होती. या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. आता हा सिनेमा अभिषेक वर्मनकडे देताना मला खूप आनंद होतो आहे, असं करण जोहरने ट्विट करत म्हटलं होतं. ‘कलंक’ या सिनेमाचं नाव ‘शिद्दत’ असेल असं आधी बोलल जात होतं. पण करण जोहरनेच याबद्दलचं स्पष्टीकरण देत सिनेमाचं नाव ‘शिद्दत’ नसून ‘कलंक’ आसल्याचं सांगितलं होतं.
काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूरने माधुरी व श्रीदेवीचा फोटो शेअर करत माधुरी सिनेमात काम करणार असल्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला होता. 19 एप्रिल 2019 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title: after Varun Dhawan and alia bhatt adity roy kapur injured on the sets of kalank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.