एकता कपूर बनली आई! सरोगसीद्वारे दिला मुलाला जन्म!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:07 AM2019-01-31T10:07:16+5:302019-01-31T10:09:26+5:30

होय, ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण एकता कपूर हिनेही लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला आहे.

after tusshar kapoor ekta kapoor has opted for surrogacy and become a mother to a baby boy | एकता कपूर बनली आई! सरोगसीद्वारे दिला मुलाला जन्म!!

एकता कपूर बनली आई! सरोगसीद्वारे दिला मुलाला जन्म!!

googlenewsNext
ठळक मुद्देएकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत.

सरोगेसीद्वारे आई-बाबा बनलेले अनेक कपल बॉलिवूडमध्ये आहेत. शाहरूख खान, आमिर खान, सनी लिओनी, सोहेल खान, कृष्णा अभिषेक असे सगळे स्टार्स सरोगसीद्वारे पालक बनलेत. याशिवाय लग्न न करता सरोगसीद्वारे मुले जन्माला घालणारेही अनेक आहेत. करण जोहर, तुषार कपूर अशी नावे या यादरीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. होय, हे आहे डेलिसोप क्वीन एकता कपूर हिचे. होय, ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांची मुलगी आणि तुषार कपूरची बहीण एकता कपूर हिनेही लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला आहे. एकताने अद्याप लग्न केलेले नाही. पण सरोगसीद्वारे आई बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. प्राप्त माहितीनुसार, तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय.

तीन वर्षांपूर्वी तुषार कपूर सरोगसीद्वारे पापा बनला होता. त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे. एकताच्या मुलाचे नामकरण मात्र अद्याप झालेले नाही. 
काही दिवसांपूर्वी एकताने लग्न न करता आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाळाची जबाबदारी उचलण्यास मी एकदम तयार आहे. पण लग्नाचा मात्र माझा विचार नाही, असे एकता म्हणाली होती.

 

एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. या मालिकेची कल्पना एकताची होती. एकता व तिची आई शोभा कपूर यांनी साकारलेल्या बालाजी टेलिफिल्मने ही मालिका प्रोड्यूस केली आणि यानंतर एकताने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण  हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी , कसौटी जिंदगी की , कहानी घर घर की आणि  नागीन  या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.

Web Title: after tusshar kapoor ekta kapoor has opted for surrogacy and become a mother to a baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.