'त्रिभंगा'नंतर अरहा महाजन दिसणार या वेबसीरिजमध्ये, साकारणार राधिका आपटेच्या बालपणीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 04:25 PM2021-02-05T16:25:27+5:302021-02-05T16:25:59+5:30

बालकलाकार अरहा महाजन हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

After 'Tribhanga', Arha Mahajan will appear in this webseries, playing the childhood role of Radhika Apte | 'त्रिभंगा'नंतर अरहा महाजन दिसणार या वेबसीरिजमध्ये, साकारणार राधिका आपटेच्या बालपणीची भूमिका

'त्रिभंगा'नंतर अरहा महाजन दिसणार या वेबसीरिजमध्ये, साकारणार राधिका आपटेच्या बालपणीची भूमिका

googlenewsNext

बालकलाकार अरहा महाजन हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. अरहा ही दिल्लीची असून, नुकत्याची रिलीज झालेल्या त्रिभंगा चित्रपटात तिने काजोलच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती हॉटस्टारवर रिलीज होणारी वेबसीरिज ओके कंप्यूटरमध्ये राधिका आपटेच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. या सीरिजमध्ये अरहा आणि राधिका आपटेसोबत विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आगामी भूमिकेबद्दल अरहा म्हणाली, “मला इतकी सुंदर भूमिका दिल्याबद्दल मी देवाचे, माझ्या पालकांचे आणि हॉटस्टारच्या निर्मात्यांचे मनापासून आभार मानते. काजोल, रेणुका शहाणे, राधिका आपटे, विजय वर्मा आणि इतर या सारख्या अनेक प्रतिभावंत आणि प्रेमळ लोकांसोबत काम केल्याचा मला अपार आनंद होतो आहे. ही पात्रे ऑन स्क्रीनवर साकार करायला मला आवडतात आणि मी देवाला प्रार्थना करते की त्याने मला अशा सुवर्ण संधी उपलब्ध करून द्याव्यात. ज्यांनी नेहमीच मला साथ दिली आहे त्या माझ्या सर्व मित्रांचे अनेक अनेक आभार ”


छोटी अरहा ही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर नवोदित विनोदी कलाकार देखील आहे. ज्या वयात मुलांना साधे युट्युब चॅनेल काय आहे  व त्यासाठी सामग्री कशी तयार करायची ह्याची जाणीव सुद्धा नसते अशा वयात तिने आपले युट्युब चॅनेल सुरु करून सोलो कॉमेडी अ‍ॅक्टचे व्हिडीओज त्यावर अपलोड केले आहेत.

‘ओके कंप्यूटर’ या वेबसीरिजच्या रिलीज डेटबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. 

Web Title: After 'Tribhanga', Arha Mahajan will appear in this webseries, playing the childhood role of Radhika Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.