सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 02:28 PM2020-05-28T14:28:29+5:302020-05-28T14:29:13+5:30

आला रे आला,‘सिंघम’आला!! कोरोनाचे केंद्र बनलेल्या धारावीला अजय देवगणची साथ

after sonu sood ajay devgn has taken the responsibility of 700-families of dharavi-ram | सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी

सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत धारावीत कोरोनातील केसेस प्रचंड वाढत आहेत. आत्तापर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दीड हजारापार गेली आहे. 

कोरोना काळात मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. बॉलिवूड स्टार्सही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी आर्थिक दान व गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था केली. पण आता स्टार्स गरजंूच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरत आहेत. सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी बस सेवा सुरु केली. आता सोनूपाठोपाठ बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण धारावीतील 700 कुटुंबाच्या मदतीसाठी समोर आला आहे. अजयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. शिवाय लोकांनाही या कामी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

‘धारावी कोव्हिडी 19चे मुख्य केंद्र बनले आहे. अनेक लोक एमसीजीएमच्या मदतीने दिवसरात्र काम करत आहेत. अनेक एनजीओ धारावीतील गरजूंना राशन व हायजीन किट्सचे वाटप करत आहे. आम्ही 700 कुटुंबाना मदत करत आहोत. तुम्हीही यात योगदान देऊ शकता,’ असे ट्विट अजय देवगणने केले आहे.

गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोनातील केसेस प्रचंड वाढत आहेत. आत्तापर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दीड हजारापार गेली आहे. 
नुकतेच अजय देवगणने सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले होते. मजुरांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचे जे संवेदनशील काम तू करतो आहेत, ते कौतुकास्पद आहे.तुला आणखी हिंमत मिळो, सोनू, असे ट्विट अजयने केले होते. अर्थात यावरून तो ट्रोलही झाला होता. सोनूचे कौतुक केले ते चांगलेच. पण तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, असे अनेकांनी अजयला सुनावले होते. तू सुद्धा रिअल लाईफ सिंघम बनू शकतोय. एकदा प्रयत्न तर करून पाहा, असा सल्ला एका युजरने त्याला दिला होता.

Web Title: after sonu sood ajay devgn has taken the responsibility of 700-families of dharavi-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.