शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:34 PM2020-02-22T16:34:20+5:302020-02-22T16:38:44+5:30

कंगणाची बहिण रंगोली चंदेलची. तिच्या येण्याच्या चाहुलनेच सारं वातावरण आनंददायी झालंय. चिमुकलीच्या येण्याआधीच मावशी कंगणाने तिचे नावही जाहिर केले आहे.

After Shilpa Shetty Kangana Ranaut's Sister Rangoli Chandel All set to Adopt A baby Girl Soon | शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज'

शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ कंगणाच्या घरी आनंदी आनंद, बहिण देणार दुस-यांदा 'गुड न्यूज'

googlenewsNext

नुकतेच सरोगसीच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा आई झाली आहे. 15 फेब्रुवारीला मुलगी झाली असून हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. आमच्या आयुष्यात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव आम्ही समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. आमच्या घरात आता ज्युनिअर एसएसके आली आहे अशा शब्दांत तिने तिचा आनंद व्यक्त केला होता. शिल्पा शेट्टी पाठोपाठ आता  कंगणाच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण त्याच्याही घरी लवकरच नन्ही परीचे आगमन होणार आहे. 


किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....या गाण्यांच्या ओळीप्रमाणे काहीशी अवस्था झालीय कंगणाची बहिण रंगोली चंदेलची. तिच्या येण्याच्या चाहुलनेच सारं वातावरण आनंददायी झालंय. चिमुकलीच्या येण्याआधीच मावशी कंगणाने तिचे नावही जाहिर केले आहे. गंगा असे नाव त्यांनी ठेवले आहे. त्यामुळे ती येणार याच कल्पनेने त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.


कंगणाची बहिण रंगोली बाळाला जन्म देणार नसून तिने गंगाला दत्तक घेतले आहे. सध्या  गंगाच्या दत्तक घेण्याची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर ही चिमुकली येणार असल्याचे रंगोलीने चाहत्यांसह तिचा आनंद शेअर केला आहे. इतकेच नाही तर तिने इतरांनाही अशाप्रकारे मुलांना दत्तक घेण्याचेही आवाहन केले आहे. सध्या सेलिब्रेटी सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देत आहेत. त्यापेक्षा जे आधीच या जगात आले आहेत. त्यांच्या आयुष्यात सुंदर क्षण निर्माण करण्यासाठी आपण त्यांना स्विकारले पाहिजे असेही रंगोलीने म्हटले आहे.  मी स्वतःला मी  नशीबवान समजते की मी एका मुलीला घर मिळवून देऊ शकली.” त्यामुळे रंगोलीने केलेलीही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. रंगोलीला याआधी एक मुलगा आहे. ज्याचं नाव पृथ्वी असं आहे. कंगना आणि पृथ्वीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
 

Web Title: After Shilpa Shetty Kangana Ranaut's Sister Rangoli Chandel All set to Adopt A baby Girl Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.