शमा सिकंदरचे तो फोटो पाहून, नेटीझन्स झाले क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 12:36 PM2019-11-23T12:36:50+5:302019-11-23T12:39:31+5:30

नेहमीच शमाच्या फोटोंची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. नेहमीच नेटीझन्स तिच्या फोटोंवर टीका करताना दिसतात. मात्र यावेळी तिचे फोटो  पाहून नेटीझन्स कमेंटस आणि लाईक्स करताना दिसतायेत.

After seeing the glamor photo of Shama Sikander, Netizens Became Crazy | शमा सिकंदरचे तो फोटो पाहून, नेटीझन्स झाले क्रेझी !

शमा सिकंदरचे तो फोटो पाहून, नेटीझन्स झाले क्रेझी !

googlenewsNext

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील शमा सिकंदर हे प्रचलित नाव आहे. ‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. मात्र शमा काही वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली होती. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. सेक्सोहोलिक सिनेमामध्ये दिसली होती. तसेच तिने मीटू मोहिमेवर देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. शमा सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते. बोल्ड फोटो शेअर करत ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. 


पुन्हा एकदा शमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांचे लक्ष वेधले आहे. नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणा-या शमाने आता ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून फोटोत ती फार सुंदर दिसत आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून शमाने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शमाचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

नेहमीच शमाच्या फोटोंची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. नेहमीच नेटीझन्स तिच्या फोटोंवर टीका करताना दिसतात. मात्र यावेळी तिचे फोटो  पाहून नेटीझन्स कमेंटस आणि लाईक्स करताना दिसतायेत. तिची स्तुती करताना दिसतात. या फोटोंमुळे तिने नेटीझन्सची मनं जिंकण्यात यश मिळवले आहे असेच दिसतंय.  

Web Title: After seeing the glamor photo of Shama Sikander, Netizens Became Crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.