सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, ‘Boycott Radhe’ ट्विटरवर ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:42 PM2021-04-23T13:42:51+5:302021-04-23T13:43:45+5:30

भाईजान सलमान खानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि काही तासातच ट्विटरवर ‘बायकॉट राधे’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.

after release salman khans radhe your most wanted bhai trailer sushant singh rajput fans trend boycott radhe on twitter | सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, ‘Boycott Radhe’ ट्विटरवर ट्रेंड

सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, ‘Boycott Radhe’ ट्विटरवर ट्रेंड

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय.

भाईजान सलमान खानच्या (Salman Khan)  ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’  (Radhe: Your Most Wanted Bhai Trailer ) या सिनेमाचा ट्रेलर कालच रिलीज झाला आणि काही तासातच ट्विटरवर ‘बायकॉट राधे’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. बॉलिवूडचा अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या  (Sushant Singh Rajput) चाहत्यांनी ‘राधे’वर बहिष्काराचे आवाहन केले.
14 जून 2020 रोजी सुशांतने कथितरित्या आत्महत्या केली होती. चाहते अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्या वर्षभरात चाहत्यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांना बायकॉट करण्याची मोहिम चालवली.

 सलमान खानलाही याचा फटका बसला. ‘राधे’चा ट्रेलर रिलीज होताच सुशांतचे चाहते अ‍ॅक्टिव्ह झालेत.  ‘सलमान खान दुस-यांचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी ओळखला जातो. अरिजीत सिंग, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप अशा अनेकांचे करिअर संपवण्याचे प्रयत्न त्याने केले आहेत, ’अशा आशयाच्या अनेक कमेंट्स करत सुशांतच्या चाहत्यांनी ‘राधे’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

हा तर बिग बजेट भोजपुरी सिनेमा

 प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात सलमानशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सलमानचे दर्दी चाहते असलेल्यांनी ‘राधे’चा ट्रेलर डोक्यावर घेतला. पण अनेकांना मात्र सलमानच्या सिनेमाचा हा ट्रेलर पाहून वॉन्टेड, दबंग आणि किक या त्याच्या जुन्या सिनेमांचीच आठवण झाली. मग सोशल मीडियावर प्रतिक्रिया तर उमटणारच. सलमानचे तेच ते चावून चावून चोथा झालेले डायलॉग, चेह-यावरचे तेच ते भाव आणि थोड्या फार फरकाने तीच ती अ‍ॅक्शन पाहून लोक निराश झालेत. रेस 3, भारत, किक, वॉन्टेड या सिनेमांचे डिलीटेड सीन्स मिक्स करून हा ट्रेलर बनवला की काय, अशी शंकाही अनेक नेटक-यांना आली. काहींनी तर हा ट्रेलर पाहून बिग बजेट भोजपुरी कंटेन्ट अशी कमेंट केली.

13 मे 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार, अशी कमिटमेंट सलमानने केली आहे आणि तो आपली ही कमिटमेंट पूर्ण करणार आहे. येत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय.

Web Title: after release salman khans radhe your most wanted bhai trailer sushant singh rajput fans trend boycott radhe on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.