कमल हसन हे त्यांच्या करिअर आणि पसर्नल लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कमल हसन जवळपास 11 वर्षे अभिनेत्री गौतमी यांच्यासोबत लिव्हइन रिलेशनशीपमध्ये होते. 2016मध्ये दोघे विभक्त झाले. 


गौतमी यांनी कमल हसन यांच्या आधी 1998मध्ये उद्योगपती संदीप भाटिया यांच्यासोबत लग्न केले होते. गौतमी आणि संदीप यांचा 1999 साली घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार गौतमी आणि कमल हसन यांची ओळख 'अपूर्वा सगोधररगल'च्या सेटवर झाली.. शाबास नायडूच्या सेटवर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या सिनेमाच्या कॉस्च्युम डिझायनर गौतमी होत्या. रिपोर्टनुसार श्रृतीने या सिनेमात गौतमीने डिझायन केलेले कपडे घालण्यास नकार दिला. त्यामुळे कमल हसन आणि गौमती यांच्यात जोरदार भांडण झाले हे भांडण ऐवढे वाढले की सिनेमाचं शूटिंग रद्द करावी लागली होती आणि इथेच दोघांच्या नात्यामध्ये ठिणगी पडल्याचे समजते.

कमल हासन यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्यात. यापैकी दोघींशी त्यांनी लग्न केले.1978 साली कमल यांनी वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचे कारण होते सारिका.वाणी गणपतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

Web Title: After living together 11 years Kamal haasan and gautami were separated gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.