शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:46 PM2021-03-23T12:46:19+5:302021-03-23T12:47:05+5:30

This time its Sunny Deol's younger son Rajvir.आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.तो स्टार कीड दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल.

After Karan Deol, Sunny Deol Is All Set To Launch Younger Son Rajvir in Bollywood... | शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा

शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या स्टार कलाकारांपेक्षा स्टार किड्सची जास्त चर्चा ऐकायला मिळते. हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसागणिक स्टार किड्स बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहेत. नुकतेच संजय कपूरची लेक शनाया कपूर बॉलिवूड मध्ये झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

त्याच पाठोपाठ आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.तो स्टार कीड दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल. 


मोठा मुलगा करण देओलनेही 'पलपल दिल के पास' या सिनेमातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. करणकडून भरपूर अपेक्षा होत्या . मात्र हा सिनेमा फारसा काही कमाल दाखवू शकला नाही. सुपरडुपर फ्लॉप ठरला.


करणचा अभिनय पाहून अनेकांनी त्याला अभिनय न करण्याचाच सल्ला दिला होता.आता करणनंतर राजवीर काय कमाल करतो हे पाहणे रंजक असणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्याचा मुलगा अवनीश बडजात्या करणार आहे. अवनीश याचीसुद्धा ही डेब्यू फिल्म असणार आहे.

Web Title: After Karan Deol, Sunny Deol Is All Set To Launch Younger Son Rajvir in Bollywood...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.