कबीर सिंग हिट झाला असला तरीही विकी कौशलचा हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही शाहिद कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:35 PM2019-07-04T16:35:10+5:302019-07-04T16:36:29+5:30

कबीर सिंग चित्रपटाने 245 कोटीहून अधिक गल्ला जमवल्यास उरीचा रेकॉर्ड मोडला जाईल. पण काहीही झाले तरी विकी कौशलचा एक रेकॉर्ड मोडणे शाहिदला शक्य नाहीये.

After Kabir Singh success Shahid Kapoor can't beat Uri: The Surgical Strike fame vicky kaushal record | कबीर सिंग हिट झाला असला तरीही विकी कौशलचा हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही शाहिद कपूर

कबीर सिंग हिट झाला असला तरीही विकी कौशलचा हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही शाहिद कपूर

googlenewsNext
ठळक मुद्देविकी हा 200 करोड क्लबमध्ये एंट्री करणारा सगळ्यात तरुण अभिनेता आहे. उरी या चित्रपटाच्यावेळी त्याचे वय केवळ 30 होते तर शाहिद हा सध्या 38 वर्षांचा आहे. त्यामुळे विकीचा हा रेकॉर्ड मोडणे शाहिदसाठी नक्कीच शक्य नाहीये. 

शाहिद कपूरच्याकबीर सिंगचा ट्रेलर आल्यापासूनच या सिनेमाची हवा तयार झाली होती. शाहिदचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारच अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती आणि झालंही तसंच. शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत खूपच चांगला गल्ला बॉक्स ऑफिसवर मिळवला आहे. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टीका होत असली तरी सुद्धा या चित्रपटगृहातील गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. या सिनेमाची कथा, गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटातील कियाराची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स प्रचंड फेमस झाले आहेत. 

कबीर सिंग प्रदर्शित झाल्यानंतर केवळ 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची ही घौडदौड पाहाता विकी कौशलच्या उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा कबीर सिंग लवकरच रेकॉर्ड मोडेल असा अंदाज लावला जात आहे. उरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 245 करोड इतका गल्ला जमवला होता. 2019 मधील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत सगळ्यात जास्त गल्ला जमवणारा चित्रपट उरी असून कबीर सिंग त्याची जागा घेईल असे म्हटले जात आहे.

कबीर सिंग चित्रपटाने 245 कोटीहून अधिक गल्ला जमवल्यास उरीचा रेकॉर्ड मोडला जाईल. पण काहीही झाले तरी विकी कौशलचा एक रेकॉर्ड मोडणे शाहिदला शक्य नाहीये. कारण विकी हा 200 करोड क्लबमध्ये एंट्री करणारा सगळ्यात तरुण अभिनेता आहे. उरी या चित्रपटाच्यावेळी त्याचे वय केवळ 30 होते तर शाहिद हा सध्या 38 वर्षांचा आहे. त्यामुळे विकीचा हा रेकॉर्ड मोडणे शाहिदसाठी नक्कीच शक्य नाहीये. 

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स  ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. पण काहींना हा कबीर सिंग प्रचंड आवडला असून ते त्याच्या प्रेमात पडले आहेत. 

Web Title: After Kabir Singh success Shahid Kapoor can't beat Uri: The Surgical Strike fame vicky kaushal record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.