बॉलिवूडचा किंग खान शाहरूख शेवटचा झिरो चित्रपटात झळकला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर शाहरूख खान कोणत्याच सिनेमात पहायला मिळाला नाही. मात्र त्याचे चाहते त्याच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. तब्बल दोन वर्षानंतर आता शाहरूख कमबॅक करतो आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल तीन चित्रपट साईन केले आहेत. 

शाहरुख खान लवकरच पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे. एकीकडे शाहरूखच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना अशी माहिती मिळते आहे की शाहरुख खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे. 2 पिढ्यांमधील अंतर हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख एका सीनिअर रॉ एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये मेकअपवर बराच भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या लूकवर या सिनेमात खूप मेहनत घेण्यात येत आहे. 

पठाण सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत. नोव्हेंबर महिन्यात पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. पहिल्या शेड्यूलमध्ये शाहरुखचे शूटिंग होणार आहे.

तर जानेवारीमध्ये पठाणच्या दुसरे शेड्यूल सुरू होणार आहे. त्यात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांचे शूटिंग होणार आहे. मुंबईच्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुख शूट करणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After a break of 2 years, Shah Rukh Khan is ready for a comeback, signed three projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.