Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 01:31 PM2021-10-09T13:31:56+5:302021-10-09T13:32:41+5:30

ब्रॅन्डने गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) जाहिरातीचं अ‍ॅडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरात बंद करण्याची घोषणा केली. हा शाहरूखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक होता. 

After Aryan Khan's arrest big brand broke ties with Shahrukh khan lost Crores | Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान!

Aryan Khan खानच्या अटकेनंतर शाहरूख खानला मोठा धक्का, कोट्यावधी रूपयांचं झालं नुकसान!

googlenewsNext

मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case) मुलगा आर्य़न खान (Aryan Khan) याला अटक झाल्याने बॉलिवूड स्टार शाहरूख खानसमोर (Shahrukh Khan) एक मोठी समस्या आली आहे. अशी माहिती आहे की आर्यनला अटक झाल्यावर एका मोठ्या ब्रॅन्डने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रॅन्डने गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानच्या जाहिरातीचं अ‍ॅडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरात बंद करण्याची घोषणा केली. हा शाहरूखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी एक होता. 

द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, याप्रकरणी काही जाणकार लोकांनी साांगितलं की, एडटेक स्टार्टअपने गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही शाहरूख खानच्या जाहिराती परत घेतल्या. याबाबत संपर्क केला असता बायजूच्या प्रवक्त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

किती कोटींची होती डील

याप्रकरणी जाणकार लोकांनी सांगितलं की, बायजूसोबत शाहरूख खानची डील ३-४ कोटी रूपये वार्षिक अशी ठरली होती. शाहरूख या कंपनीचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर आहे आणि त्याच्या येण्याने कंपनीने ग्रोथही केली आहे. ते म्हणाले की, 'त्यांनी शाहरूखशी संबंधित सगळं प्रमोशन सध्या थांबवलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला ड्रग्स प्रकरण सुरू असताना त्याच्यासोबत प्रमोशन करायचं नाहीये. पण हे अजून स्पष्ट नाही की, काय बायजूने शाहरूख खानला ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर  म्हणून काढून टाकलं? 

दरम्यान शाहरूख खान हुंदई, एलजी दुबई टुरिज्म, आयसीआयसीआय बॅंक आणि रिलायन्स जियोसारख्या मोठ्या कंपन्यांचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. तेच बायजू शाहरूखच्या शाहरूखच्या सर्वात मोठ्या डीलपैकी एक होती

 

Web Title: After Aryan Khan's arrest big brand broke ties with Shahrukh khan lost Crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.