Aryan Khan Arrest News: अक्षय कुमारचा मुलगादेखील होता क्रुझ ड्रग्स पार्टीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:59 PM2021-10-05T15:59:45+5:302021-10-05T16:00:27+5:30

Aryan Khan Arrest News: आर्यनसोबत या पार्टीमध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरव असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. 

after aryan khan arrest akshay kumar son aarav kumar is also in trend | Aryan Khan Arrest News: अक्षय कुमारचा मुलगादेखील होता क्रुझ ड्रग्स पार्टीत?

Aryan Khan Arrest News: अक्षय कुमारचा मुलगादेखील होता क्रुझ ड्रग्स पार्टीत?

googlenewsNext
ठळक मुद्देक्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक झाल्यानंतर या पार्टीमध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियादेखील असल्याचं म्हटलं जातं होतं.

बॉलिवूड स्टार किड्सची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. यात शाहरुख खानची तीनही मुलं कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चिले जातात. परंतु, यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स पार्टीमुळे चर्चेत आला आहे. शनिवारी एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खान ड्रग्स पार्टीत सहभागी असल्याचं समोर आलं. त्यामुळे आर्यनमुळे पुन्हा एकदा स्टारकिड्स चर्चेत आले आहेत. यात अनेकांनी आर्यनसह काही स्टार किड्सला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर आर्यनसोबत या पार्टीमध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरव असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. 

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक झाल्यानंतर या पार्टीमध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियादेखील असल्याचं म्हटलं जातं होतं. सोशल मीडियावर अनेकांनी याविषयी काही पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Cruise Drug Case: आर्यनसह अटकेत असलेल्या आरोपींसाठी कुटुंबीयांनी आणलं बर्गर?

सध्या आरव त्याच्या कुटुंबीयांसोबत विदेशात फिरायला गेला असून त्याचा या ड्रग्स पार्टीशी काहीही संबंध नसल्याचं ट्विंकलने तिच्या पोस्टमधून सांगायता प्रयत्न केला आहे. ट्विंकलने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत आरव असून तो ट्विंकलच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. या फोटोवरुन आई-मुलामधील प्रेम दिसून येत आहे.

दरम्यान, शनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर छापा टाकला. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आर्यन खानसह दिल्लीतील अनेक नामांकित उद्योगपतींच्या मुलांचा समावेश आहे. यात ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.
 

Web Title: after aryan khan arrest akshay kumar son aarav kumar is also in trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.