after anushka sharma became mother now people start sharing funny memes on taimur ali khan | इकडे विरूष्काला मुलगी झाली अन् तिकडे तैमूर चर्चेत आला, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

इकडे विरूष्काला मुलगी झाली अन् तिकडे तैमूर चर्चेत आला, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ठळक मुद्देतैमूर आता 4 वर्षांचा झालाय. जन्मापासूनच तो जाम चर्चेत आहे. अगदी तो दिसला रे दिसला की फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झालीये. काल 11 जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अनुष्का आई झाल्याची बातमी व्हायरल झाली आणि काहीच क्षणात करिना कपूर व सैफ अली खानचा मुलगा तैमूर अचानक चर्चेत आला. त्याच्यावरचे एक ना अनेक मीम्स व्हायरल झालेत.
आता तैमूर नाही तर विरूष्काच्या मुलीची अधिक चर्चा होईल, असे म्हणत नेटक-यांनी मजेदार मीम्स शेअर केलेत. फिर अपना काम खल्लास, तेरा काम हो गया तू जा, अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है..., असे काय काय लिहित नेटक-यांनी फनी मीम्सचा पाऊस पाडला.

तैमूर आता 4 वर्षांचा झालाय. जन्मापासूनच तो जाम चर्चेत आहे. अगदी तो दिसला रे दिसला की फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात. क्षणात त्याचे फोटो व्हायरल होतात. बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय स्टारकिड म्हणून तो ओळखला जातो. पण आता विराट व अनुष्काच्या मुलीच्या रूपात बॉलिवूड स्टार्सकिड्सच्या यादीत आणखी एक भर पडली आहे. आता यामुळे तैमूरची लोकप्रियता घटते की वाढते, ते बघूच. तोपर्यंत तैमूरवरचे हे फनी मीम्स एकदा पाहाच.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after anushka sharma became mother now people start sharing funny memes on taimur ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.