कौतुकास्पद! जॅकलिन फर्नांडिसनं घेतली महाराष्ट्रातील दोन गावं दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:02 PM2020-08-18T13:02:31+5:302020-08-18T13:02:58+5:30

जॅकलिन फर्नांडिसची ही कामगिरी वाचून तुम्ही कराल तिचे कौतूक

Admirable! Jacqueline Fernandes adopted two villages in Maharashtra | कौतुकास्पद! जॅकलिन फर्नांडिसनं घेतली महाराष्ट्रातील दोन गावं दत्तक

कौतुकास्पद! जॅकलिन फर्नांडिसनं घेतली महाराष्ट्रातील दोन गावं दत्तक

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवुड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मग ते शेकडो श्रमिकांना आपल्या गावी पाठवण्यासाठी प्रयत्न करणे असो की जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणे असो. नुकतेच जॅकलिन फर्नांडिसने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे, पाथर्डी आणि सकुर दत्तक घेतली आहेत. तीन वर्षांच्या या परियोजनेदरम्यान या गावातील कुपोषित गावकऱ्यांना जेवण पुरवण्यात येणार आहे. यासाठी जॅकलिनने आपल्या या पालघर प्रोजेक्ट्साठी 'अ‍ॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन'सोबत करार केला आहे.

याविषयी जॅकलिन म्हणाली की, “हे माझ्या मनात खूप आधीपासूनच होते. सध्या सुरू असलेल्या या महामारीमुळे सर्वांसाठी हे वर्ष कष्टमय राहिले आहे. आपल्यापैकी काही भाग्यशाली आहेत, मात्र आपल्या समाजातील एक वर्ग जीवनावश्यक गरजांसाठी देखील संघर्ष करतो आहे.”


दोन गांवांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या परियोजनेविषयी बोलताना जॅकलिन म्हणाली की, “या परियोजनेतून जवळपास 1,550 लोकांपर्यंत पोहोचता येणार असून गावकरी ज्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असेल, त्यांच्या कुपोषणाची तपासणी केली जाईल. कुपोषणाविषयी जागरूकता सत्र देखील आयोजित करण्यात येणार आहेत. आम्ही 150 महिलांची नवजात बाळांची देखभाल करणे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी जागरूकता वाढवण्यासोबतच सात फ्रंटलाइन श्रमिकांना प्रशिक्षण आणि नोकरीकरिता सहाय्य करण्यात येईल. गावातील 20 परिवारांचे आरोग्य ट्रॅक करण्याची आमची योजना आहे, ज्यांना कुपोषण दूर करण्याची साधने उपलब्ध करून देण्यात येतील आणि 20 महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत सहाय्य देण्यात येईल आणि ते निरोगी राहतील, हे पाहिले जाईल. सोबतच, 20 मुलांच्या कुपोषणावर इलाज करण्यात येईल आणि गावांमध्ये 20 स्वयंपाक आंगण स्थापण्यात येईल. हे समाजाच्या उपयोगी येणे माझ्या आई वडिलांनी मला शिकवले आहे आणि माझ्या या निर्णयाचे त्यांनी ठाम समर्थन केले आहे."


जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आगामी चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे, याआधी 'हाउसफुल 2', 'रेस 2' आणि 'ढिशूम'सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यासोबतच ती 'किक' फ्रेंचाइजीच्या दूसऱ्या भागामध्ये देखील ती असणार आहे, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Admirable! Jacqueline Fernandes adopted two villages in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.