म्हणून कलंकच्या प्रमोशनमधून गायब आहे आदित्य कपूर, समोर आले हे कारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:05 PM2019-04-09T12:05:47+5:302019-04-09T12:35:03+5:30

या सिनेमात माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुन धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Aditya roy kapur was missing from kalank promotions know real reason | म्हणून कलंकच्या प्रमोशनमधून गायब आहे आदित्य कपूर, समोर आले हे कारण 

म्हणून कलंकच्या प्रमोशनमधून गायब आहे आदित्य कपूर, समोर आले हे कारण 

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहेत्यामुळे आता तो कलंकच्या प्रमोशनमधून सध्या गायब आहे

करण जोहरचा मल्टी स्टारर कलंक सिनेमा १७ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुन धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला आदित्य रॉय कपूर प्रमोशनमधून गायब दिसतोय.  


आजतकच्या रिपोर्टनुसार, आदित्य कपूर सध्या गोवामध्ये 'मलंग' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्याचवेळेस मुंबईत कलंकचे प्रमोशन सुरु असल्याने दोनही ठिकाणीची सांगड घातलाना आदित्यची चांगलीच दमछाक होतेय. याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला आहे.

त्यामुळे डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आदित्य पुढचे दोन-तीन दिवस आराम करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य गोव्यात शूटिंग करतो आहे आणि कलंकच्या प्रमोशनसाठी त्याला सतत गोव्यावरुन मुंबईला यावं लागतं होते. याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला. त्यामुळे आता तो कलंकच्या प्रमोशनमधून सध्या गायब आहे.  



 
कलंक या सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील एका श्रीमंत कुटुंबाची कथा पाहायला मिळणार आहे. जातीय दंगली उसळत असतानाच आणि देशाची फाळणी होत असताना त्यांच्यात अनेक वर्षं लपवले गेलेली काही गुपितं बाहेर पडतात अशी सिनेमाची कथा असल्याची चर्चा आहे. या सिनेमात देव, सत्या, रूप आणि जाफर या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. 

Web Title: Aditya roy kapur was missing from kalank promotions know real reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.