या कारणामुळे कॉलेजमधून ही सस्पेंड झाला होता आदित्य नारायण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:15 AM2017-10-05T10:15:06+5:302017-10-05T15:45:06+5:30

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या मुलाच्या चुकीबाबत माफी मागितली आहे. आदित्य नारायणने नुकतीच  रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स ...

Aditya Narayan, who was suspended from college for this reason, was suspended | या कारणामुळे कॉलेजमधून ही सस्पेंड झाला होता आदित्य नारायण

या कारणामुळे कॉलेजमधून ही सस्पेंड झाला होता आदित्य नारायण

googlenewsNext
लिवूडचा लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या मुलाच्या चुकीबाबत माफी मागितली आहे. आदित्य नारायणने नुकतीच  रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली होती. मीडियामध्ये आदित्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसंगाचे गांभिर्य ओळखून उदित नारायण यांनी माफी मागितली आहे. 
स्पोर्ट बॉयच्या रिपोर्टनुसार उदित नारायने यांनी मीडियासमोर येऊन मुलाच्या चुकीची माफी मागितली आहे. गेल्या रविवारी आपल्या मित्रांसोबत रायपूर एअरपोर्टवरुन परतताना जास्तीचं सामान बाळगल्यामुळे एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी आदित्य नारायणला अडवलं होतं. जास्तीचं सामान बाळगल्यामुळे त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. पण आदित्यने अधिकाऱ्यांसोबत वाद घातला आणि त्याला मुंबईत ये तुला बघून घेऊन अशी धमकी सुद्धा दिली. आदित्याचा हा हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. यानंतर उदित नारायण यांनी माफी मागितली. या व्हिडिओत आदित्य त्या अधिकाऱ्यावर ओरडताना दिसतो आहे. "इथं 10 लोक आहे आणि सगळे जण पाहत आहे. आधी तुम्ही मला शिवीगाळ करण्यास सांगितलं त्यानंतरच मी शिवी दिली. तुम्ही मला सांगताय शिवी देण्याचा अधिकार नाही. पण मला जे बोलायचं आहे ते मी बोलणारच असा दम आदित्यने अधिकाऱ्यांना भरला. आदित्य एका शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी रायपूरला गेला होता. 
याआधी कॉलेजमध्ये असतानासुद्धा आपल्या गैरर्वतणुकीमुळे आदित्यला सस्पेंड करण्यात आले होते. श्रुती वोझाल या मुलीने ट्वीटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. आदित्यच्या अशाच वागणुकीमुळे त्याला कॉलेजमधून दोन आठवडे घरी बसवण्यात आले होते. आदित्यने त्यावेळी कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डसोबत हुज्जत घातली होती. मीठीबाई कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तक्रारची नोटीस लावण्यात आली होती. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आहे. मात्र यानंतर श्रुतीने आपले ट्वीट डिलीट केले.   
आदित्य सध्या झी टीव्हीवरील सा रे ग मा पा या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतो आहे. याआधी ही त्यांने सा रे ग मा पा या शेच्या अनेक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. 

Web Title: Aditya Narayan, who was suspended from college for this reason, was suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.