ठळक मुद्दे 'मलाल' हा एक रोमाँटिक सिनेमा आहेलवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, मोरया’ यांसारख्या गाण्यांनी आदर्श शिंदे हे नाव घराघरात जाऊन पोहोचले. आदर्श शिंदे ने एका पेक्षा एक मराठी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पाहाडी आवाज ही आदर्शच्या गायकिची खासियत आहे.

'संगीत सम्राट' या रिअॅलिटी शोच्या परिक्षकाची जबाबदारी देखील त्यांने पार पडली आहे. आदर्शच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' सिनेमात आदर्शने गाणं गायले आहे. हे गाणं गणपतीचं आहे. 


'मलाल' सिनेमातून शर्मिन सहगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे शर्मिन सहगल आणि वेद जाफरीचा मुलगा  मिजान जाफरी 'मलाल'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'मलाल' हा एक रोमाँटिक सिनेमा आहे.

ज्यात शर्मिन आणि मिजान रोन्मास करताना दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी यांनी याआधी ही बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना लाँच केले आहे. ११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते.

हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला होता. पण यातील सोनम आणि रणबीरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता भन्साळी खुद्द आपल्या भाचीला लॉन्च करणार आहेत. ‘मलाल’ हा चित्रपट दिग्दर्शक मंगेश दिग्दर्शित करणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Adarsh shinde sing song for mlaala movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.