बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने गर्लफ्रेंड गॅब्रिएलाशी अजून लग्न केलेलं नाही. मात्र नुकताच एका मुलाला जन्म दिला असून अर्जुन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. लग्नाआधी अभिनेत्री गरोदर राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्री या लग्नाआधी गरोदर राहिल्या आहेत. यातील काही अभिनेत्रींनी मुलं झाल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं, तर काहींनी सिंगल मदर म्हणून मुलांना वाढवलं.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्या लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या. त्यामुळे त्यांनी आधीच लग्न झालेल्या बोनी कपूरशी लग्न केलं. श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

कोंकणा सेन शर्माने प्रियकर रणवीर शौरीशी अचानक लग्न केलं आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांनी ते आई- बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. प्रेग्नंसीमुळे कोंकणाने लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीही लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती असं म्हटलं जातं. सेलिनाने पीटर हागशी लग्न केलं. तिला दोन जुळी मुलं आहेत. लग्नानंतर ती पुन्हा एकदा गरोदर राहिली होती. तेव्हाही तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यातील एक मुल जन्माच्या काही तासांमध्येच वारलं. 

अभिनेत्री महिमा चौधरीही लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती. नंतर तिने प्रियकर बॉबी मुखर्जीशी लग्न केलं.

कमल हसन यांची पत्नी सारिका लग्नाआधीच गरोदर राहिल्या होत्या, असं सांगितलं जातं. सारिका यांना श्रुती आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत.

वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची भेट नीना गुप्ता यांच्याशी झाली. अवघ्या काही भेटींमध्ये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. १९८९ मध्ये नीना गरोदर राहिल्या. रिचर्ड्स आणि नीना यांनी कधीही लग्न केलं नाही.

एकट्या नीना यांनी मुलगी मसबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. २००८ मध्ये नीना गुप्ता यांनी दिल्लीतील व्यावसायिक विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.


Web Title: actresses gets pregnant without marriage mahima sarika sridevi konkana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.