Crazy Fans : अभिनेत्रीला पाहताच मुलांनी सुरु केला पाठलाग, मग झाले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:46 PM2019-12-17T12:46:41+5:302019-12-17T12:49:15+5:30

होय, अभिनेत्रीला पाहून काही तरूण इतके क्रेजी झालेत की, त्यांनी बाईकवरून तिच्या गाडीचा पाठलाग केला.

actress vaani kapoor car chased by group of crazy fans on bike for selfie video going viral | Crazy Fans : अभिनेत्रीला पाहताच मुलांनी सुरु केला पाठलाग, मग झाले असे काही...

Crazy Fans : अभिनेत्रीला पाहताच मुलांनी सुरु केला पाठलाग, मग झाले असे काही...

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बॉलिवूड स्टार्ससाठी क्रेजी असलेल्या चाहत्यांचे अनेक किस्से आपण ऐकतो. अनेकदा या क्रेजी फॅन्समुळे स्टार्सना अडचणीचा सामना करावा लागतो. अलीकडे अभिनेत्री वाणी कपूरसोबत असेच काही झाले. होय, वाणी कपूरला पाहून काही तरूण इतके क्रेजी झालेत की, त्यांनी बाईकवरून तिच्या गाडीचा पाठलाग केला. अखेर वाणीला तिची गाडी थांबवावी लागली.
खरे याचवर्षी मे महिन्यात एका चाहत्याने वाणीला असाच वैताग आणला होता. त्याने वाणीचा इतका पिच्छा पुरवला होता की, वाणीला पोलिसात तक्रार करावी लागली होती. आता पुन्हा एकदा तिच्यासोबत असेच काही घडले. वाणी आपल्या कारमधून निघाली असताना, एका तरूणांच्या टोळक्याने तिला पाहिले आणि तिला पाहताच तिचा पाठलाग सुरु केला.

वाणी कारमध्ये होती तर हे तरूण त्यांच्या बाईकवर. ब-याच दूरपर्यंत पाठलाग झाल्यावर अखेर वाणीला तिची गाडी थांबवावी लागली. तरूणांनी सेल्फीची गळ घातल्यानंतर वाणी अगदी शांतपणे सेल्फी द्यायला तयार झाली. पण याचवेळी अचानक एका तरूणाने गाडीच्या खिडकीतून डोकं आत घालत वाणीजवळ जाण्याच्या प्रयत्न केला. या प्रकाराने एक क्षण वाणी घाबरली. पण मोठ्या समजदारीने तिने ही स्थिती हाताळली आणि सगळ्यांना सेल्फी देत त्यांच्यासोबत हातही मिळवला.


  मानव मंगलानीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तूर्तास हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी वाणीचे कौतुक केले आहे तर काहींनी तिचा पाठलाग करणा-यांना चांगलेच सुनावले आहे.

Web Title: actress vaani kapoor car chased by group of crazy fans on bike for selfie video going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.