श्रुती मराठेच्या या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, फोटो पाहताच म्हणाल- अप्सरा आली

By गीतांजली | Published: September 25, 2020 08:00 AM2020-09-25T08:00:00+5:302020-09-25T08:00:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत

Actress shruti marathe looks beautiful in white color saree | श्रुती मराठेच्या या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, फोटो पाहताच म्हणाल- अप्सरा आली

श्रुती मराठेच्या या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, फोटो पाहताच म्हणाल- अप्सरा आली

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत.  आपल्या अभिनयाने साऊथच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. अभिनेत्री श्रुती मराठे ही साऊथमध्ये प्रसिद्ध आहे. श्रुती नेहमी आपल्या स्टायल आणि फॅशनमध्ये बदल करत असते. अलीकडचे श्रुतीने तिचा सफेद आणि लाल साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत श्रुतीने 80 च्या दशकातील अभिनेत्रींप्रमाणे हेअर स्टाईल केली आहे. श्रुतीचा हा लूक तिच्या चाहत्यांनी चांगलाच आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोवर झाला आहे.

श्रुतीने नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

साऊथमध्ये 'श्रुती प्रकाश' नावने प्रसिद्ध
श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Web Title: Actress shruti marathe looks beautiful in white color saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.