actress padma lakshmi twitter reaction on donald trump covid 19 positive | अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा

अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा

ठळक मुद्दे  प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

सहकारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर  क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आलेत. ट्रम्प पॉझिटीव्ह येताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. आता तरी गंभीरपणे घ्या, हा काही विनोद नाही, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. भरीस भर म्हणजे, एका अभिनेत्रीनेही यावरून ट्रम्प यांची खिल्ली उडवली. या अभिनेत्रीचे नाव काय तर पद्मा लक्ष्मी.

ट्रम्प व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर पद्मा लक्ष्मीने एक ट्विट केले.
‘मी जो बिडन सारखे मास्क वापरत नाही. जेव्हा तेव्हा ते मास्कमध्येच दिसतात, असे म्हणत तुम्ही त्यांची खिल्ली उडवली होती. अन् दोन दिवसानंतर पाहा काय झाले?’, असा उपरोधिक टोला तिने डोनाल्ड ट्रम्प यांना लगावला.
ट्रम्प यांनी अलीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडन यांच्या मास्कची खिल्ली उडवली होती. या पार्श्वभूमीवर पद्मा लक्ष्मी हिने ट्रम्पवर निशाणा साधला आहे. 

यालाच कर्म म्हणतात, असे आणखी एक ट्विटही तिने केले.

भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी म्हणायला 49 वर्षांची आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत ती नव्या हिरोईन्सलाही मात देते. स्वत:चे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणारी पद्मा लक्ष्मीने अलीकडे न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.

अन् आयुष्यच बदलले...
स्पेनमध्ये कॅफेत बसलेली असताना एका मॉडेलिंग एजंटची पद्मालक्ष्मीकडे नजर गेली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. विशेष म्हणजे पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मालक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे.

2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती.  पण मॉडेलिंगमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या पद्मालक्ष्मीला अभिनय क्षेत्रात टीकाव लागला नाही. ‘बूम’ आपटला आणि हा सिनेमा आपटल्यानंतर अमेरिकेला परत जाऊन पद्मालक्ष्मीने टीव्ही शोवर लक्ष केंद्रीत केले.

पद्मालक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.
  प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. त्यावेळी रश्दी 51 वर्षांचे होते तर लक्ष्मी केवळ 28 वर्षांची होती. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

49 वर्षांच्या या बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सगळेच झालेत अवाक्

In Pics: 50 वर्षांची झाली सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी, सलमान रश्दींवर केला होता खळबळजनक आरोप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress padma lakshmi twitter reaction on donald trump covid 19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.