या अभिनेत्रीने शेअर केला ‘नो फिल्टर फोटो’; ओळखणेही झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:15 PM2019-09-17T14:15:27+5:302019-09-17T14:20:49+5:30

अनेक चित्रपटांत काम करणारी ही अभिनेत्री दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तूर्तास तिचा एक ‘नो फिल्टर फोटो’ फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

actress lisa ray share unfiltered and free photo on her instagram | या अभिनेत्रीने शेअर केला ‘नो फिल्टर फोटो’; ओळखणेही झाले कठीण

या अभिनेत्रीने शेअर केला ‘नो फिल्टर फोटो’; ओळखणेही झाले कठीण

googlenewsNext
ठळक मुद्दे2001 मध्ये प्रदर्शित ‘कसूर’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.

अनेक चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री लिसा रे दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. कमी वयात लिसाला कॅन्सरने गाठले आणि ती बॉलिवूडपासून दूर गेली. पण तूर्तास लिसाचा एक ‘नो फिल्टर फोटो’ फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा फोटो पाहिल्यानंतर ही अभिनेत्री लिसा आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. 


स्वत: लिसाने हा फोटो शेअर केला आहे. ‘ही मी आहे 47 वर्षांची. स्वच्छंदी आणि कुठल्याही मेकअपशिवाय. तुमच्यात अशी हिंमत आहे? मी तरूण होती, तेव्हा माझ्यातही अशी हिंमत नव्हती. प्रत्येकजण तुमचे मोल समजू शकत नाही. पण स्वत:च्या शरीरावर प्रेम करायला शिका. स्वत:ला स्वीकारा. महिलांनो, स्वत:चे मोल जाणा...,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

लिसाने 2012 मध्ये जेसन डेनीसोबत लग्न केले. 2018 मध्ये तिने सुफी व सोलेल या जुळ्या मुलींना जन्म दिला. दीपा मेहताच्या ‘वॉटर’ या चित्रपटातील लिसाची भूमिका प्रचंड गाजली होती.  पण तिला खरी लोकप्रियता मिळाली होती ती नुसरत फतेह अली खान यांच्या ‘आफरीन आफरीन’ या गाण्यामुळे.

2001 मध्ये प्रदर्शित ‘कसूर’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. याशिवाय  वीरप्पन आणि दोबारा या चित्रपटातही ती झळकली.  पण तिचा सगळा फोकस अ‍ॅक्टिंगपेक्षा लेखनावर होता. नुकतेच लिसाचे ‘इन क्लोज टू द बोन’ हे पुस्तक प्रकाशित झाले. २००९ साली लिसाला मल्टिपल मिलोमा नावाचा कॅन्सर झाला होता.
 

Web Title: actress lisa ray share unfiltered and free photo on her instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.