ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ या चित्रपटानंतर कियारा सध्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात बिझी आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. खरे तर ‘फग्ली’ या पहिल्याच चित्रपटाने करिअरच्या सुरुवातीला कियाराला मोठा धक्का दिला. पहिलाच डेब्यू सिनेमा फ्लॉप झाला. पण कियाराने हार मानली नाही. पुढे ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी ’ हा सिनेमा मिळाला आणि कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली. तिचा गोड चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले. यानंतर ‘लस्ट स्टोरीज्’ही वेबसीरिज आली आणि कियारा ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कबीर सिंग’  या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. तूर्तास कियारा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहेत.


होय, कियाराने सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना वेड लावणारे आहेत. सध्या कियारा इटलीत हॉलीडे एन्जॉय करतेय. यादरम्यानचे तिचे हे फोटो.


कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया आहे. इंडस्ट्रीत येण्याआधी तिने हे नाव बदलले. अर्थात सलमान खानने दिलेल्या सल्ल्यानुसार. कारण कियारा बॉलिवूडमध्ये येण्याआधी आलिया भट नावाची अभिनेत्री इथे होती. एकाच इंडस्ट्रीत आलिया नावाच्या दोन अभिनेत्री असू शकत नाही, त्यामुळे सलमानने कियाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, आलियाचे कियारा झाले.


‘कबीर सिंग’ या चित्रपटानंतर कियारा सध्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ‘गुड न्यूज’ या चित्रपटातही कियाराची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Web Title: actress kiara advani latest bold photo raise temperature on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.