अभिनेत्री दीया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 01:36 PM2021-09-18T13:36:19+5:302021-09-18T13:36:44+5:30

दीया आणि अव्यानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे.

Actress Dia Mirza shared a photo of the boy for the first time, the photo is going viral | अभिनेत्री दीया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो, फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री दीया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो, फोटो होतोय व्हायरल

Next

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच दीयाने मुलाचा जन्माच्या ४ महिन्यांनंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीया आणि अव्यानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे.

दीया मिर्झाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत दिया आणि अव्यान दिसत आहेत. या फोटोला तिने स्केच फिल्टर वापरले आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, आमच्या अव्यानच्या कहाणीला सुरुवात झाली आहे. १५.०९.२०२१ अव्यानच्या पहिल्या ४ महिन्यात ज्यांनी त्याची काळजी घेतली त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सगळ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या प्रेमाचे आम्ही आभार मानतो. अव्यान, तू आम्हाला विनम्रता आणि प्रार्थनेत किती शक्ती असते ते दाखवून दिले. तू आम्हाला पूर्ण केले आहे.


पुढे दीयाने म्हटले की, यावेळी संपूर्ण कुटुंब आणि मित्रांनी केलेल्या प्रार्थनेशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित आहे. एनआयसीयुमध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टीचा सामना करत असलेल्या सर्व पालकांना, तुमच्यासाठी आणि तुमच्या लहान मुलासाठी प्रेम, शक्ती आणि प्रार्थनाची गरज आहे. 


दीया मिर्झाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न केले. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अव्यान हा दीयाचा पहिला मुलगा आहे. 

Web Title: Actress Dia Mirza shared a photo of the boy for the first time, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app