करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:45 PM2021-10-18T14:45:38+5:302021-10-18T14:46:31+5:30

Bhumika chawla: भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

actress bhumika chawla talks about her bollywood career jab we met movie | करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम

करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम

googlenewsNext
ठळक मुद्दे 'मुन्ना भाई एमबीबीएस'चीही नाकारली ऑफर

करीना कपूर-खान (kareena kapoor-khan) आणि शाहिद कपूर (shahid kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला जब वी मेट (Jab We Met) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातील गीत ही प्रेक्षकांना विशेष भावली होती. ही भूमिका करीना कपूरने साकारली होती. या भूमिकेच्या माध्यमातून करीनाच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर सादर झाली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. विशेष म्हणजे बरीच वर्ष उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षक गीतवर भरभरुन प्रेम करतात. परंतु, या चित्रपटातील गीतच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला होता. मात्र, या अभिनेत्रीने नकार दिल्यामुळे करीनाला ही भूमिका मिळाली.

अभिनेता सलमान खानचा (salman khan) तेरे नाम (tere naam) या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भूमिका चावला (bhumika chawla) हिला प्रथम जब वी मेटची (Jab We Met) ऑफर देण्यात आली होती. मात्र, भूमिकाने ही ऑफर नाकारली. तेरे नाममुळे भूमिकाचा एक स्वतंत्र चाहता वर्ग तयार झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तिला बॉलिवूड चित्रपटामध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, भूमिकाने ही संधी गमावली. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी उलगडा केला आहे.

आज इतक्या वर्षांनंतर मी मागे वळून पाहिल्यानंतर मला एकच वाटतं ते म्हणजे नशीब. पण, जर खोलात जाऊन विचार केला तर त्याची अनेक कारणं समोर येतील. मुळात सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्यावेळी माझ्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. पण, त्यावेळी मी काही साऊथ चित्रपटांमध्ये काम करत होते. ज्यामुळे माझ्या डेट्स मॅच करत नव्हत्या, असं भूमिका म्हणाली.

पुढे ती म्हणते, त्यावेळी मला जब वी मेट (Jab We Met) आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' (Munna Bhai MBBS) या दोन बॉलिवूड चित्रपटांची ऑफर मिळाली होती. पण मला त्या चित्रपटांमध्ये काम करता आलं नाही. जर ते चित्रपट केले असते तर कदाचित आज माझं करिअर काहीसं वेगळं असतं. तेलुगूमधील देखील अशाच दोन चित्रपटांना मला नकार द्यावा लागला. कारण, त्यावेळी माझं लग्न ठरलं होतं आणि मी आधीपासूनच ५ चित्रपटांमध्ये काम करत होते. मी सोडलेले ते दोन्ही चित्रपट तेलुगूमधील ब्लॉकबस्टर ठरले.

दरम्यान, भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सलमान खानसोबत तिने 'तेरे नाम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत.
 

Web Title: actress bhumika chawla talks about her bollywood career jab we met movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.