वयाच्या 18व्या वर्षी भूमी पेडणेकरच्या डोक्यावरुन हरपले होते वडिलांचे छत्र, असा करावा लागला होता संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:02 PM2020-06-22T18:02:16+5:302020-06-22T18:07:28+5:30

वडिलांच्या निधनानंतर तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागले.

Actress bhumi pednekar's father died when she was 18 years old | वयाच्या 18व्या वर्षी भूमी पेडणेकरच्या डोक्यावरुन हरपले होते वडिलांचे छत्र, असा करावा लागला होता संघर्ष

वयाच्या 18व्या वर्षी भूमी पेडणेकरच्या डोक्यावरुन हरपले होते वडिलांचे छत्र, असा करावा लागला होता संघर्ष

googlenewsNext

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. दम लगा के हईशा चित्रपटातून भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. मात्र हे खूप कमी लोकांना माहिती आहे की या यशासाठी भूमिला संघर्ष करावा लागला आहे. फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार भूमी 18 वर्षांची असता तिच्या वडिलांचे निधन झाले. भूमीच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. भूमीची लहान बहिण समीक्षा तेव्हा 15 वर्षांची होती. यानंतर तिच्या आई सिंगल मदर म्हणून दोनही बहिणींना मोठे केले. 

रिपोर्टनुसार भूमी म्हणाली वडिलांच्या निधनानंतर तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागले. तिने वडील गेल्यानंतर अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला. आज मागे वळून बघताना तिला फार समाधान मिळते की तिने कुटुंबासाठी केलेल्या मेहनतीच  चीझ झाले. भूमी म्हणते, आज तिला जे काही यश मिळाले आहे ते तिच्या वडिलांचा आर्शीवाद आहे.


भूमी पेडणेकर हिने दम लगा के हईशा, शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया यासारख्या सिनेमात काम करून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. सांड का आँख व पति पत्नी और वो सारख्या चित्रपटांमध्ये देखील ती दिसली.

Web Title: Actress bhumi pednekar's father died when she was 18 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.