झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 06:00 AM2020-07-25T06:00:00+5:302020-07-25T06:00:02+5:30

डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर परखड मत मांडताना दिसते.

Actors also use their sexuality to get roles, Ekta Kapoor’s big statement on casting couch | झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार

झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाचे आरोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. बॉलिवूडमध्ये नेपोटीझम आणि लैंगिक शोषण हे दोन मुद्द्यांवर नेहमी चर्चा होते.

 

डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर परखड मत मांडताना दिसते. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत बंद खोलीआड होणा-या कास्टिंग काऊचची चर्चा होती. अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी अशाप्रकारचे आरोप केले होते. मात्र यावर केवळ आरोप झाले आणि चर्चा रंगली.  याच विषयावर एकता कपूर हिने एका कार्यक्रमात तिचे मत मांडले होते.

 

या क्षेत्रात लैंगिक शोषण होत असलं तरी केवळ निर्मातेच आपल्या पदाचा गैरफायदा घेतात असं नाही, तर कलाकारही काम मिळविण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी ठेवतात असं धक्कादायक विधान एकता कपूर हिने केले होते. "एक निर्माता आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. केवळ या इंडस्ट्रीमधील शक्तीशाली व्यक्ती त्यांच्या नावाचा गैरवापर करुन नवख्या आणि उद्योन्मुख कलाकारांचा फायदा घेतात असं बोललं जात होतं. मात्र यांत तथ्य नसल्याचे तिने म्हटले होते.  कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. इथंही नाण्याला दोन बाजू असून केवळ एकाच बाजूची चर्चा होते असे एकताने म्हटले होते.

Web Title: Actors also use their sexuality to get roles, Ekta Kapoor’s big statement on casting couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.