विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:13 PM2018-12-16T12:13:37+5:302018-12-16T12:17:15+5:30

प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे काल १५ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.  यांच्यामागे अक्षय खन्ना व राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत.  

actor vinod khanna wife Geetanjali khanna died in alibaug |  विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन

 विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्दे अलिबागमधील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७० वर्षांच्या होत्या. आज सकाळी गीतांजली खन्ना यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन्ही मुले त्यांच्या सोब

प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचे काल १५ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.  यांच्यामागे अक्षय खन्ना व राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत.  अलिबागमधील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७० वर्षांच्या होत्या. आज सकाळी गीतांजली खन्ना यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन्ही मुले त्यांच्या सोबत होती.  

खन्ना कुटुंबीयांचे अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात फार्म हाऊस आहे. याठिकाणी गीतांजली खन्ना व अभिनेते राहुल खन्ना व अक्षय खन्ना हे नेहमी येत असतात. काल  सकाळी गीतांजली खन्ना या मुंबई येथून मांडवा येथे आल्या होत्या. रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर खाजगी डॉक्टरला तपासणीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर काही वेळातच गीतांजली यांचे निधन झाले. गीतांजली या विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी.

सन १९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी  गीतांजलीसोबत लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडून ओशोच्या सेवेत लागले. ओशोच्या सेवेत ते असे काही गुंतले की, त्यांनी कुटुंबापासून फारकत घेतली. सगळे काही सोडून विनोद यांनी अमेरिकेत ओशो कम्युन रजनीशपूरममध्ये राहण्याचा निर्णय घेतला.  गीतांजली यांच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता. विनोद यांच्या या निर्णयाने गीतांजली यांनी अक्षय व राहुल या दोन मुलांना घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी विनोद यांना घटस्फोट दिला. अर्थात या घटस्फोटानंतर पाच वर्षांनी विनोद खन्ना मुंबईला परतले आणि त्यांनी नव्याने आयुष्य सुुरू करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले. कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी हा मुलगा व श्रद्धा ही मुलगी अशी दोन मुले झाली. अर्थात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी पित्याचे कर्तव्य निभावले. अक्षय खन्नाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी त्यांनी ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवला. राहुलचे करिअरही त्यांनी मार्गी लावले. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनीही जगाचा निरोप घेतला.

Web Title: actor vinod khanna wife Geetanjali khanna died in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.