पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

By गीतांजली | Published: December 23, 2020 01:31 PM2020-12-23T13:31:11+5:302020-12-23T13:37:20+5:30

या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल.

Actor vicky kaushal makes rock solid body shared photo on instagram | पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अब्सचा ट्रेंड प्रत्येक अभिनेत्याने चांगलाच मेंटेन केला आहे. शाहरुखपासून ते हृतिकपर्यंत सिक्स पॅक अब्सची जादू पाहायला मिळाली. अभिनेता विक्की कौशलने  त्याचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विकी जीममध्ये बसलेला दिसतोय. सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. या माध्यमातून विकी आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर विकीच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे.

अभिनेता राजकुमार रावने विकीच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले, 'रॉक सॉलिड ब्रदर.'  भाई, भाई, भाई अशी कमेंट अभिनेता साकिब सलीमने केली आहे. यावरुन एक गोष्ट मात्र स्पष्ट होतेय की विकीने हा नवा लूक नव्या सिनेमासाठी केला असावा. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर विकी आगामी सिनेमा महाभारतमध्ये महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी वजन वाढवणार आहे. तब्बल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी विकी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे. सध्या यासाठीच विकी वर्कआऊट करतो. हिती आहे. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. सिनेमाचे शूटिंग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. ग्रीनलँड, आइसलँड व्यतिरिक्त इंग्लंड, टोकियो, न्यूझीलंड आणि नामीबिया हेदेखील असतील.

Web Title: Actor vicky kaushal makes rock solid body shared photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.