बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटात ठरली फ्लॉप, पण तिचा मुलगा आहे आज सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:00 PM2019-07-28T21:00:00+5:302019-07-28T21:00:00+5:30

टायगर श्रॉफचा आई आएशा श्रॉफ यांचा सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांचा बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्यावेळचा आहे.

actor Tiger Shroffs mom Ayesha Shroff old photo with Mohnish Bahl goes viral looks unrecognizable | बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटात ठरली फ्लॉप, पण तिचा मुलगा आहे आज सुपरस्टार

बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटात ठरली फ्लॉप, पण तिचा मुलगा आहे आज सुपरस्टार

googlenewsNext

टायगर श्रॉफचा आई आएशा श्रॉफ यांचा सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांचा बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्यावेळचा आहे. या फोटोत अभिनेता मोहनीश बहलदेखील पहायला मिळत आहेत. या फोटोत आएशा त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.

सोशल मीडियावर सध्या सेलिब्रेटींचे जुने फोटो पहायला मिळत आहेत. लोकांनादेखील सेलेब्सचे जुने फोटो व आठवणींमध्ये इंटरेस्ट असतो. ते हे फोटो व्हायरल करतात. आता अभिनेता टायगर श्रॉफची आई आएशा श्रॉफ यांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात त्यांना ओळखणंदेखील कठीण झालं आहे. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा आएशा चित्रपटात काम करत होत्या. या फोटोत आएशा श्रॉफ अभिनेता मोहनीश बहलच्या जवळ बसली आहे. 


हा फोटो १९८४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट तेरी बाहो में दरम्यानचा आहे. या फोटोत मोहनीश बहल टारझन लूकमध्ये दिसत आहे. त्यालादेखील या गेटअपमध्ये ओळखणं कठीण झालं आहे. आएशा यांचा फोटो पाहून लोकांनी त्यांचं कौतूक केलं. तर मोहनीश यांना टारझन लूकमध्ये वाईटरित्या ट्रोल केलं.


आएशा यांनी एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि जेव्हा त्यांची जादू अभिनयात नाही चालू शकली तेव्हा त्यांनी सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. १९८७ साली अभिनेता जॅकी श्रॉफसोबत लग्न केलं.

त्यानंतर निर्मितीची जबाबदारी सांभाळली. त्यांनी ग्रहण, जिस देश में गंगा रहता है यासारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

Web Title: actor Tiger Shroffs mom Ayesha Shroff old photo with Mohnish Bahl goes viral looks unrecognizable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.