अभिनेता रितेश देशमुख नव्या इनिंगसाठी सज्ज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:35 PM2021-08-17T16:35:50+5:302021-08-17T16:36:16+5:30

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Actor Riteish Deshmukh ready for new innings, post shared on social media | अभिनेता रितेश देशमुख नव्या इनिंगसाठी सज्ज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख नव्या इनिंगसाठी सज्ज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक झाला आहे. कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या शशांक घोष दिग्दर्शित चित्रपटात रितेश दिसणार आहे. या चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असलेला दिसून येत आहे. तसेच नुकतेच घटस्फोटीत आणि सुखी असे लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसते आहे. तर त्याने शेअर केलेल्या आणखी दुसऱ्या फोटोत त्याच्यासमोर अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाच्या कहाणीबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.


‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा एका मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीलावर आधारीत आहे. यात त्याचे स्वतःचे एक रहस्य आहे. मॅचमेकरला वाटते की त्याच्याशिवाय प्रत्येकाने लग्न केले पाहिजे. जेव्हा मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकील हे दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा चित्रपटात काय मजेशीर कहाणी घडू शकते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’, ‘डर्टी पिक्चर’, ‘किक’ आणि ‘गब्बर इज बॅक’ यासारखे चित्रपटांचे लेखन करणारे रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.


रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या चित्रपटाविषयी दिग्दर्शक शशांक घोष म्हणाले, नेटफ्लिक्ससह प्लॅन ए प्लॅन बीची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. ही एक अनोखी कथा आहे. यात असामान्य पात्र एकमेकांच्या विरोधात असतील. यासोबतच प्रेमाला नव्या रूपात सादर करणार आहेत. नेटफ्लिक्सवर जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्याचा मला पूर्णपणे आनंद झाला आहे आणि मला खात्री आहे की लोकांना ते आवडेल.

Web Title: Actor Riteish Deshmukh ready for new innings, post shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.