म्हणे, अर्जुन कपूरमुळे बुडाली येस बँक; जाणून घ्या काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:52 AM2020-03-11T11:52:09+5:302020-03-11T11:53:27+5:30

येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेन्डचे नाव...

actor kamaal r khan slams arjun kapoor for yes bank crisis tweet viral-ram | म्हणे, अर्जुन कपूरमुळे बुडाली येस बँक; जाणून घ्या काय आहे भानगड

म्हणे, अर्जुन कपूरमुळे बुडाली येस बँक; जाणून घ्या काय आहे भानगड

googlenewsNext
ठळक मुद्देकेआरकेच्या या खोचक ट्विटवर अर्जुन कपूर अद्याप बोललेला नाही. पण हो, युजर्सनी मात्र यावर वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाखो ग्राहक चिंतेत आहेत. याला जबाबदार कोण तर मलायका अरोराचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर. आश्चर्य वाटले ना? अर्थात हे आमचे मत नाही. तर कमाल आर खान अर्थात केआरकेचे मत आहे. होय, येस बँक बुडाल्याचे खापर केआरकेने अभिनेता अर्जुन कपूरच्या माथ्यावर फोडले आहे. येस बँकेशी अर्जुनचा संबध जोडून केआरकेने अर्जुन कपूरला जोरदार टोला लगावला आहे.
आता ही भानगड नेमकी काय, हे जाणून घेऊ. तर नेहमी वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणा-या केआरकेने पुन्हा एकदा एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने अर्जुन कपूरला लक्ष्य केले आहे.


‘ अर्जुन कपूरने आतापर्यंत ज्या काही चित्रपटांमध्ये काम केरे ते सर्व चित्रपट जवळपास बुडाले आहेत. त्याचा ‘2 स्टेट’ हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला. या चित्रपटात अर्जुन येस बँकेत काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते आणि आता तर येस बँकच बुडालीय,’ असे केआरकेने म्हटले आहे.


केआरकेच्या या खोचक ट्विटवर अर्जुन कपूर अद्याप बोललेला नाही. पण हो, युजर्सनी मात्र यावर वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहे. इतका मतलब पनौती है, असे एका युजरने यावर कमेंट देताना लिहिले आहे. क्या कनेक्ट किया है आपने, टू गुड, असे एकाने लिहिले आहे. तर अन्य एकाचे ‘एक नंबर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने तर ‘इतनी बुरी तरह कौन लेता है भाई’ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
 

Web Title: actor kamaal r khan slams arjun kapoor for yes bank crisis tweet viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.